Restless Legs Syndrome Can Be symptom of Kidney Damage: किडनी या आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या आवयवांपैकी एक आहे. ते शरीर निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी अनेक पद्धतीने काम करत असतात. किडनी आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे फिल्टर प्लांट म्हणून काम करते. जर हे फिल्टर करणे थांबवले तर शरीरात हानिकारक कचरा आणि अतिरिक्त द्रव जमा होऊ लागते. मग हे विषारी पदार्थ केवळ तुमच्या किडनीचेच आरोग्य नाही तर संपूर्ण आयुष्यच धोक्यात आणू शकतात.

किडनी का महत्त्वाच्या आहेत?

अमेरिकेच्या नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते, शरीराचे रासायनिक संतुलन राखण्यात किडनीची भूमिका महत्त्वाची असते. ते दररोज अंदाजे २०० लिटर रक्त फिल्टर करतात. जर या किडनी बऱ्या नसतील तर त्या अनेक पद्धतीने तसे संकेत देतात. यापैकी झोपेचा अभाव हे असेच एक लक्षण आहे. क्रॉनिक किडनी डिसीज असलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांना झोपेशी संबंधित काही समस्या येतात आणि याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

रक्तात विषारी पदार्थांचा साठा

किडनीचा आजार आणि निद्रानाश यांच्यात एक मजबूत संबंध आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या एका अहवालानुसार, जेव्हा किडनी योग्यरित्या फिल्टर करण्याचे काम करू शकत नाही, तेव्हा विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकण्याऐवजी रक्तप्रवाहात साचून राहतात. यामुळे शरीराची आराम करण्याची क्षमता बिघडते आणि याने ग्रस्त व्यक्तीला झोपणे कठीण होऊन जाते.

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम

रेस्टलेस लेग्ज सिंड्रोम (RLS) हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा आजार किडनीच्या आजाराच्या रूग्णांमध्ये खूप सामान्य आहे. यामुळे पायांमध्ये विचित्र प्रकारे मुंग्या येणे किंवा खाज सुटते. यामुळे रूग्णाला सतत पाय हलवावेसे वाटतात. ही समस्या सहसा रात्री आणि विश्रांती घेत असताना उद्भवते. त्यामुळे झोप येणे कठीण होऊन जाते. तसंच वारंवार जाग येते. अनेकदा ही परिस्थिती लोहाच्या कमतरतेशी किंवा शरीरातील काही खनिज असंतुलनाशी संबंधित असते.

सामान्य लोकांपेक्षा किडनीचा आजार असलेल्या लोकांमध्ये स्लीप एपनिया अधिक सामान्य आहे. ही अशी स्थिती आहे जिथे झोपेच्या दरम्यान श्वास वारंवार सुरू होतो आणि थांबतो आणि त्यामुळे झोपेत व्यत्यय येऊन जाग येते. श्वसनक्रिया सुरळीतपणे सुरू राहत नाही. यामुळे रूग्णांना दिवसभर थकवा जाणवू शकतो.

हार्मोनल बदल

किडनी शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. जेव्हा किडनी आजारी असतात तेव्हा झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे (मेलाटोनिन) संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे झोपेत अडथळा येतो.