Kitchen Jugaad : पोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा आपण दररोज वापर करतो. सकाळी आणि रात्रीच्या जेवणात भाजीबरोबर पोळी आपण खातो. काही लोक गव्हाच्या पिठासाठी गहू खरेदी करतात पण काही लोक गहू खरेदी करण्यापेक्षा थेट गव्हाचे पीठ खरेदी करतात. हे गव्हाचे पीठ चांगले आहे का, हे तपासणे, तितकेच गरजेचे आहे. पीठ भेसळयुक्त आहे की नाही, हे ओळखण्यासाठी अनेक ट्रिक सांगणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, हे कसं ओळखायचं; याविषयी सांगताना दिसते.

व्हायरल होतोय व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये गव्हाचे पीठ दिसेल. या व्हिडीओत महिला सांगते, “तुम्ही गव्हाचे पीठ विकत आणता का? जर हो तर आजच तुमचे गव्हाचे पीठ तपासून पाहा. तुमच्या गव्हाच्या पीठामध्ये भेसळ असू शकते.तुम्हाला वाटेल या पीठामध्ये कसली भेसळ असते तर मैदा किंवा चॉक पावडर त्यात मिक्स केला जातो.” त्यानंतर ही महिला गव्हाचे पीठ चांगले आहे का, हे घरच्या घरी तपासण्यासाठी ट्रिक सांगते.

हेही वाचा : उन्हाळ्यात फ्रिजमुळे विजेचं बिल खूप येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; पैशांची होईल मोठी बचत, व्हिडिओ एकदा पाहाच

जाणून घ्या ट्रिक

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की महिला मंद आचेवर एक तवा ठेवते आणि तव्यावर हे गव्हाचे पीठ टाकते. पिठाला लगेच रंग आला की समजायचे की त्यात भेसळ आहे आणि जर या पिठाला लगेच रंग आला नाही तर समजायचे की यात कोणतीही भेसळ नाही.ही ट्रिक वापरून तुम्ही घरच्या घरी गव्हाचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही, हे ओळखू शकता.

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमचे गव्हाचे पीठ भेसळयुक्त असू शकते” प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असेच भन्नाट ट्रिक, घरगुती उपाय सांगणारे व्हिडीओ शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांना ५३ हजार लोक फॉलो करतात. अनेकांना त्यांचे हे व्हिडीओ खूप आवडतात.