How to clean copper-brass utensils:आपल्याकडे अनेक घरांमध्ये सणावाराला आवर्जून घरातील तांब्या-पितळेची भांडी घासून स्वच्छ केली जातात. पण, तांब्या-पितळेची भांडी साफ करायला खूप वेळ लागतो, शिवाय हे काम खूप कंटाळवाणे आहे. तुम्हीही या समस्येतून जात असाल तर आता ही भांडी सहज स्वच्छ करण्याचा सोपा उपाय जाणून घ्या.

सध्या सोशल मीडियावर क्लीनिंग हॅकचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेतल्यास, तुम्हाला तांब्याची भांडी साफ करणे कठीण वाटणार नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @beautyandvlogs_ या अकाउन्टवर शेअर करण्यात आला आहे.

साहित्य:

  • एक वाटी व्हिनेगर
  • एक वाटी मीठ
  • एक लिंबू

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात व्हिनेगर टाका. आता त्यात मीठ घालून हे मिश्रण विरघळेपर्यंत तसेच ठेवा. व्हिनेगरमध्ये मीठ पूर्णपणे विरघळल्यावर त्यात लिंबू पिळून घ्या.

या घरगुती मिश्रणाच्या मदतीने तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. या मिश्रणात तुम्हाला जी भांडी स्वच्छ करायची आहेत, ती फक्त १० सेकंदांसाठी बुडवा.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु, यावेळी हे लक्षात ठेवा की या मिश्रणात भांडी पूर्णपणे बुडतील याची काळजी घ्या. जर ती पूर्ण बुडली नाही तर तुम्ही भांड्याची एक बाजू एका वेळी आणि दुसरी बाजू दुसऱ्या वेळी बुडवून स्वच्छ करू शकता. फक्त काही मिनिटांत तुमची काळी भांडी चकचकीत होतील.