Kitchen Jugaad Video: कंगव्याचा वापर आपण दररोज करतो. केस विंचरण्यासाठी कंगवा वापरला जातो. केसांमधून गुंता सोडविण्यासाठी कंगव्याचा आपण वापर करतो. पण तुम्ही कधी कंगव्याचा वापर स्वयंपाकघरात केला आहे का? बहुतेक गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात कंगव्याचा अनोखा वापर करून दाखवण्यात आला आहे. 

गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी पालेभाज्या चिरण्यासाठी कंगव्याचा वापर केला आहे का? नाही ना.. मग एकदा कंगव्याच्या साहाय्याने भाज्या चिरुन बघा. हा जुगाड तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. पालेभाज्या आणि कंगव्याचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा: Toilet Cleaning Tips: केसाचं तेल टॉयलेटमध्ये टाकून पाहा; परिणाम पाहून तुम्हीही म्हणाल, “कमाल झाली…”)

नेमकं काय करायचं? 

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने, मेथीची भाजी घेतली आहे आणि एक नवीन कंगवा घेतला आहे. त्यानंतर मेथीच्या भाजीचे दोन भाग केले. त्यातील काही मेथी घेऊन महिलेने त्यावर कंगव्याचे दात फिरविले आहे. केस ज्या प्रमाणे विंचरले जातात, त्याचप्रमाणे महिला मेथीची भाजी विंचरताना दिसत आहे. यामुळे मेथीच्या भाजीची पाने सहज निघत आहेत आणि भाजी सहज चिरली जात आहे. पालेभाज्या साफ करायला, चिरायला फार वेळ लागतो, म्हणून कंगव्याच्या मदतीने तुमचे पालेभाज्या चिरण्याचे काम सोपे होईल, असे महिलेचे म्हणणे आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Indian Vlogger Pinki या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)