चंद्रग्रहण हे केवळ वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे नसून त्याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि अनेक कामे करण्यास मनाई आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबरला होणार आहे. जे वृषभ आणि कृतिका नक्षत्रात असेल. जाणून घ्या कोणत्या राशींवर या ग्रहणाचा प्रभाव पडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रग्रहण कधी आणि कुठे दिसणार?

हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. जे कार्तिक शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होणार आहे. ग्रहण सकाळी ११:३४ वाजता सुरू होईल आणि ०५:३३ वाजता संपेल. ग्रहण कालावधीचा एकूण कालावधी ०५ तास ५९ मिनिटे असेल. हे ग्रहण भारतातील अरुणाचल प्रदेश, पश्चिम युरोप, पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, यूके, रशिया, चीन आणि अटलांटिक महासागराच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागात दिसणार आहे.

कोणत्या राशीसाठी असणार हे ग्रहण शुभ?

तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ राहील. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुठेतरी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तिथे यश मिळू शकते. व्यावसायिकांनाही या काळात विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे. मात्र मेष, वृषभ, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात काळजी घ्यावी. कारण या लोकांसाठी ग्रहण शुभ नाही.

सुतक कालावधी असेल का?

या ग्रहणाव्यतिरिक्त २०२१ ते २०३० दरम्यान एकूण २० आंशिक आणि पेनम्ब्रल चंद्रग्रहण भारतात पाहायला मिळत आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. ते पाहण्यासाठी विशेष उपकरणे लागतात. धार्मिक दृष्टिकोनातून त्या ग्रहणाचे महत्त्व मानले जाते जे उघड्या डोळ्यांनी पाहता येते. कारण हे ग्रहण सर्वसाधारणपणे दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध ठरणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lunar eclipse 2021 is going to happen in taurus 3 zodiac signs can get tremendous success in career scsm
First published on: 10-11-2021 at 17:15 IST