महिंद्रा कंपनीने आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील XUV300 गाडीचं ऑटोमॅटिक व्हर्जन लाँच केलं आहे. यात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (AMT) केवळ डिझेल इंजिनच्या W8 आणि W8 (O) व्हेरिअंटसह मिळेल. अनुक्रमे 11.50 लाख आणि 12.70 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी या दोन्ही व्हेरिअंट्सची किंमत आहे. या दोन्ही व्हेरिअंटच्या मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या व्हर्जनशी तुलना केली असता ऑटोमॅटिक व्हेरिअंटची किंमत 55 हजार रुपयांनी अधिक आहे. XUV300 AMT पर्ल व्हाइट, अॅक्वामरीन आणि रेड रेज अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. देशभरातील महिंद्राच्या सर्व डिलर्सकडे ही कार विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिंद्रा एक्सयूवी 300 ऑटोमॅटिकमध्ये 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे. 6-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय असलेलं हे इंजिन 115 bhp ची ऊर्जा आणि 300 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. ऑटो शिफ्ट यूनिटचा वापर यामध्ये करण्यात आल्यामुळे कारचं अॅक्सिलरेशन खूप सहजसोपं होतं. या गिअरबॉक्समध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल हे दोन्ही मोड देण्यात आलेत.

फीचर्स –
W8 व्हेरिअंटमध्ये 17-इंच अॅलॉय व्हिल्स, ड्युअल एअरबॅग्स, हिल-होल्ड, ईएसपी, फ्रंट आणि रिअर फॉग लॅम्प्स, रिव्हर्स कॅमेरा, ऑटो हेडलॅम्प आणि वायपर्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, की-लेस एंट्री, क्रूझ कंट्रोल आणि इंजन स्टार्ट/स्टॉप बटन यांसारखे फीचर्स आहेत. तर, W8 (O) व्हेरिअंटमध्ये या सर्व फीचर्सव्यतिरिक्त अजून 5 एअरबॅग म्हणजेच एकूण 7 एयरबॅग, सनरूफ, हीटेड विंग मिरर्स, डायमंड-कट अॅलॉय व्हिल्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, फ्रंट पार्किंग सेंसर्स आणि लेदर अपहोल्स्ट्री यांसारखे फीचर्स आहेत.

स्पर्धा –
महिंद्रा एक्सयूवी 300 ची मारुती विटारा ब्रिझा आणि टाटा निक्सॉन यांसारख्या गांड्यांशी स्पर्धा असेल. या दोनेही एसयूव्हीच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटच्या किंमतीचा विचार केल्यास एक्सयूवी 300 ची किंमत अधिक आहे. एक्सयूवी300 ऑटोमॅटिक व्हेरिअंटमध्ये केवळ डिझेल इंजिनसह उपलब्ध असून किंमत 11.50 लाख ते 12.70 लाख रुपयांदरम्यान आहे. तर निक्सॉनच्या डिझेल इंजिन-ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची किंमत 8.94 लाख ते 11 लाख आणि ब्रिझा डिझेल इंजिन-ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची किंमत 8.70 लाख ते 10.43 लाख रुपयांदरम्यान आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra xuv300 amt launched in india know all features and price sas
First published on: 03-07-2019 at 14:15 IST