Making Natural Sindoor At Home: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्यात कुंकवाचा टिळा लावला जातो. कुंकवाला सौभाग्याचे प्रतीकही म्हटले जाते. हिंदू धर्मात विवाहित महिला लग्नानंतर सोळा शृंगार करतात. या सोळा अलंकारांपैकी कुंकू सर्वात पहिले आहे. मात्र, सध्या बाजारात भेसळयुक्त कुंकू विकले जाते, ज्यामुळे अनेकांना अॅलर्जीची समस्या निर्माण होते.

कुंकवामध्ये घातक रसायने मिसळली जातात

तुम्हीही बाजारातून कुंकू खरेदी करून लावत असाल तर सावधान. त्या कुंकवामध्ये शिसे आणि सल्फेटसारखे अनेक धोकादायक रसायनेदेखील असू शकतात. कपाळावर लावलेले हे कुंकू घरच्या घरीही बनवता येते. पूर्वीच्या काळी स्त्रिया घरी बनवलेले कुंकू वापरायच्या.

घरी कुंकू कसे तयार करायचे?

आजही काही ठिकाणी स्त्रिया स्वतः घरी बनवलेले कुंकू वापरतात आणि मग लावतात, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी हर्बल कुंकू कसे बनवायचे हे सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी कुंकू बनवू शकता.

हेही वाचा: भाजीत कोथिंबीर कधी घालायची? ९० टक्के लोकांना माहीत नाही ही योग्य पद्धत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंकू बनवण्याचे साहित्य

  • १ वाटी हळद
  • २ चमचा चुना
  • १ चमचा गुलाबजल
  • २०-२५ गुलाबाच्या पाकळ्या
  • २ चमचे देशी तूप

कुंकू बनवण्याची पद्धत

घरी कुंकू बनवण्यासाठी आधी हळद घ्या. आता त्यात चुना, गुलाबजल, गुलाबाच्या पाकळ्या आणि देशी तूप घाला. आता हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी सहज कुंकू बनवू शकता. हे कुंकू लावल्यानंतर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत.