निर्धारित अटींचे र्निबध घालून विक्री

काही औषधांना विदेशात बंदी असूनही भारतात मात्र काही तरतुदींच्या अंतर्गत त्यांची विक्री करण्यास परवानगी असल्याचे लोकसभेत सांगण्यात आले आहे. आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी बंदी घालण्यात आलेल्या औषधांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, नाइमसुलाइड, अ‍ॅनालजिन आणि पियोग्लिटाजोन या औषधांना देशात विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

[jwplayer jPX7MVNf]

सुरक्षा आणि प्रभावीपणा या संबंधित असणाऱ्या अनेक औषधांवर विदेशात बंदी घालण्यात आली आहे. काही देशांत यावर तपासणी करण्यात येत आहे तर काही देशांमध्ये निर्धारित अटींचे र्निबध लादून या औषधांची विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

नाइमसुलाइडचे उत्पादन, विक्री आणि वितरण करण्यास देशात परवानगी असली तरी १२ वर्षांखालील मुलाला हे औषध देण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. अ‍ॅनालजिनची विक्री आणि वितरण करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी ते वापरण्याबाबत औषधाच्या पॅकेजमध्ये माहिती देण्यात येत आहे. इतर औषधांबाबतही योग्य ते र्निबध घालून या औषधांची देशात विक्री करण्यात येत असल्याचे कुलस्ते यांनी माहिती देताना सांगितले.

 

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

[jwplayer 4Ldgg0db]