MG Motors ची बहुप्रतिक्षित पहिली कार Hector SUV अखेर भारतात लाँच झाली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने अनावरण केल्यापासून ही कार बरीच चर्चेत होती. एमजी मोटर्सच्या पदार्पणामुळे भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात बरीच उलथापालथ झाली आहे. आकर्षक किंमतीसह Hector SUV लाँच करण्यात आलीये. भारतात या कारच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 12.18 लाख रुपये (एक्स शोरुम) तर टॉप व्हेरिअंटची किंमत 16.88 लाख रुपये आहे. या सेगमेंटमध्ये आतापर्यंत टाटाची हॅरियर अव्वल होती, पण हेक्टरच्या आगमनानंतर हे चित्र बदलू शकतं. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या कारसाठी डिलिव्हरी सुरू केली जाईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. यासाठी आगाऊ नोंदणी केलेल्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.  टाटा हॅरियर, महिंद्रा XUV500 आणि Hyundai टक्सन यांसारख्या गाड्यांसोबत हेक्टरची थेट स्पर्धा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्याचा काळ वायरलेस कनेक्टीविटीचा आहे. मोबाइल, स्मार्टवॉचद्वारे इंटरनेटचा वापर आपण करतच असतो, तर अ‍ॅमेझॉन एको, गुगल होम यांसारख्या उपकरणांना केवळ बोलून आदेश (व्हॉइस कमांड) देऊन अनेक कामे करू शकतो. याच तंत्रज्ञानाचा वापर भारतात पदार्पण करू पाहणाऱ्या ‘एमजी मोटर’च्या हेक्टर या एसयूव्हीत करण्यात आला आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली Hector SUV ही कंपनीची भारतातील पहिलीच कार आहे. याशिवाय ही भारतातील पहिली 50 हून जास्त कनेक्टेड फीचर्स असलेली इंटरनेट कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या एसयूव्हीत देण्यात आलेल्या काही सुविधा या श्रेणीत प्रथमच देण्यात आल्या असून भारताच्या एसयूव्ही बाजारात हेक्टर एक दमदार दावेदार ठरणार आहे. केवळ एसयूव्ही बाजारात स्वत:चे स्थान तयार करणेच नाही तर एमजीसाठी भारतातील वाट सुकर करण्याची मोठी जबाबदारी हेक्टरवर आहे. हेक्टरच्या यशाचा परिणाम एमजी मोटर्सच्या भारतात येणाऱ्या गाडय़ांवर होणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mg motors hector suv launched price revealed know all features sas
First published on: 28-06-2019 at 16:09 IST