भारतीय स्मार्टफोन कंपनी माइक्रोमॅक्सने नोव्हेंबरच्या सुरूवातीलाच आपली नवीन micromax in series लाँच केली होती. त्यावेळी कंपनीने दोन डिव्हाइस Micromax In Note 1 आणि Micromax In 1B लॉन्च केले होते. त्यातील Micromax In Note 1 हा फोन आज पुन्हा एकदा फ्लॅश-सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात Micromax In Note 1 या फोनसाठी पहिल्यांदा सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या सेलमध्ये या फोनला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि सेल सुरू होताच अवघ्या काही मिनिटांतच हा फोन सोल्ड आउट झाला होता. आज दुसऱ्यांदा ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर दुपारी 12 वाजेपासून फोनच्या सेलला सुरूवात होत आहे. सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्सही आहेत. ऑफरनुसार, अमेरिकन एक्सप्रेस कार्ड होल्डर्सना फोन खरेदी केल्यास 5000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. तर, अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवर 10 टक्के आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.

किंमत आणि स्पेसिफिकेशन्स :-
Micromax In Note 1 फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 499 रुपये आहे. हा फोन व्हाइट आणि ग्रीन अशा दोन कलरच्या पर्यायात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असून हा फोन अंड्रॉइड 10 वर कार्यरत असेल. डिस्प्लेची डिझाइन पंचहोल असून त्यात सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये मीडियाटेक हीलियोG85 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64/128 जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. त्यातील ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही. याशिवाय फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Micromax in note 1 goes on sale in india via flipkart check price and offers sas
First published on: 01-12-2020 at 11:45 IST