मायक्रोमॅक्स कंपनीने मंगळवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात आपल्या इन्फीनिटी मालिकेतील Micromax Infinity N12 आणि N11 हे स्मार्टफोन लाँच केलेत. या दोन्ही स्मार्टफोनची खासीयत म्हणजे यामध्ये नॉच डिस्प्ले, 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि 4000mAh बॅटरी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माइक्रोमॅक्स एन12 ची किंमत 9 हजार 999 रुपये, तर एन11 ची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारांमध्ये हे फोन खरेदी करता येतील. मायक्रोमॅक्सने आपल्या नव्या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी रिलायंस जिओसोबत भागीदारी केलीये. जिओच्या ग्राहकांना फोन खरेदी केल्यास 2 हजार 200 रुपये कॅशबॅक आणि 50 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. ब्ल्यू लगून, वियोला आणि वेल्वेट रेड कलर्समध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल.

या दोन्ही स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 13 आणि 5 मेगापिक्सल कॅमेऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

फिचर्स Micromax Infinity N12 –
डिस्प्ले – 6.19 इंच
प्रोसेसर- 2 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा- 16-मेगापिक्सल
रिझोल्यूशन- 720×1500 पिक्सल
रॅम -3 जीबी
ओएस- अॅन्ड्रॉइड 8.1
स्टोरेज – 32 जीबी
रिअर कॅमेरा – 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 4000 एमएएच

फिचर्स Micromax Infinity N11-
डिस्प्ले – 6.19 इंच
प्रोसेसर- 2 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा – 8-मेगापिक्सल
रिझोल्यूशन – 720×1500 पिक्सल
रॅम – 2 जीबी
ओएस- अॅन्ड्रॉइड 8.1
स्टोरेज – 32 जीबी
रिअर कॅमेरा – 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 4000 एमएएच

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Micromax infinity n11 and infinity n12 launched
First published on: 18-12-2018 at 17:00 IST