नोटाबंदीमुळे ई-व्यवहार करण्यावर नागरीकांनी भर दिला. यामध्ये नेटबँकिंगबरोबरच मोबाईल बँकिंगलाही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. मोबाईलच्या एका क्लीकवर व्यवहार करणे शक्य झाल्याने अनेक जण त्याचा वापर करु लागले. मात्र हे करताना तुमची फसवणूक होणार नाही ना याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईल हरवल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे या व्यवहारांवर काही परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत निष्काळजीपणा न करता योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा निश्चितच उपयोग होतो. पाहूयात सुरक्षित मोबाईल बँकिंगसाठीच्या खास टिप्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. मोबाईलला लॉक ठेवा, यासाठी एखादा पासवर्ड सेट करा. यामुळे मोबाईल कधी हरवला तरी काही गैरव्यवहार होऊ शकणार नाही.

२. तुम्ही ज्या बँकेचे अकाऊंट वापरता त्याला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी रजिस्टर करा. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी बँकेचे अपडेटस येत राहतील.

३. मोबाईल रिपेअरींगला किंवा दुसऱ्या कोणाला वापरण्यासाठी देणार असाल तर ब्राऊजिंग हिस्टरी, कॅशे क्लिअर करा.

४. मोबाईल कोणाला देत असाल तर तुम्ही वापरत असलेले बँकेचे अॅप्लिकेशन काही काळाकरता ब्लॉक करा. बँकेत सांगून अशाप्रकारे अॅप ब्लॉक करण्याची सुविधा वापरता येऊ शकते.

५. बँकेशी निगडित व्यवहाराबाबत कोणतीही गोष्ट मोबाईलमध्ये सेव्ह करु नका. अनेकदा आपण विसरतो म्हणून मेसेज, नोटस किंवा इतर ठिकाणी पासवर्ड किंवा इतर माहिती सेव्ह करुन ठेवतो. पण अशाप्रकारे माहिती सेव्ह करणे धोक्याचे ठरु शकते.

६. मोबाईल बँकिंगसाठी तुमची सिस्टीम अपग्रेड असणे गरजेचे असते. तसेच तुमचा ब्राऊजर अपडेट आहे ना हे तपासून पाहा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile banking easy security tips
First published on: 17-01-2019 at 19:31 IST