‘मोटोरोला’ने गेल्या आठवड्यात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Moto G9 लाँच केला. त्यानंतर आज (दि.31) पहिल्यांदाच हा फोन फ्लॅश-सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. पहिल्या सेलमध्ये हा फोन 500 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. दुपारी 12 वाजेपासून फोनसाठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलला सुरूवात होईल. सेलमध्ये Moto G9 च्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. ट्रिपल रिअर कॅमेरा , 6.5 इंच डिस्प्ले, वॉटर-रिपेलंट डिझाइन यांसारखे अनेक वैशिष्ट्ये या फोनमध्ये आहेत. मोटो जी-9 हा फोन फॉरेस्ट ग्रीन आणि सफायर ब्लू अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑफर :-
सेलमध्ये हा फोन ICICI Bank किंवा येस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 500 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय या दोन्ही बॅंकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन ईएमआयद्वारे फोन खरेदी केल्यासही फायदा होईल. तसेच, ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तर, ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वरही 5 टक्के डिस्काउंट आहे. याशिवाय, पार्टनर ऑफरअंतर्गत एक्स्चेंजमध्ये हा फोन खरेदी केल्यास 6 महिने गुगल वन ट्रायल फ्री मिळेल. याव्यतिरिक्त , दर महिन्याला 1000 रुपये नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे.

स्पेसिफिकेशन्स –
Moto G9 फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 10 वर कार्यरत या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये मागील बाजूला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये इंटर्नल स्टोरेज 64GB असून माइक्रो एसडीकार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याचा पर्यायही आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप सी, वायफाय, ब्लूटूथ आणि हेडफोन यांसारखे स्टँडर्ड फीचर्स आहेत. तसेच, फोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.

किंमत –
रेडमी नोट 9 प्रो, सॅमसंग गॅलेक्सी एम21 आणि रिअलमी 6i यांसारख्या स्मार्टफोन्ससोबत मोटो जी-9 ची टक्कर असेल. Moto G9 ची किंमत 11 हजार 499 रुपये आहे. पण, पहिल्या सेलमध्ये कंपनी  ICICI Bank किंवा येस बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास  500 रुपये इंस्टंट डिस्काउंट देत आहे. ही डिस्काउंट ऑफर फक्त पहिल्या सेलसाठीच असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 500 रुपयांच्या डिस्काउंटसह Moto G9 स्मार्टफोन 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.  4GB रॅम आणि 64GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5,000 mAh ची दमदार बॅटरी मिळेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola moto g9 to go on first sale in india via flipkart check offers price specifications sas
First published on: 31-08-2020 at 09:47 IST