दिवाळीच्या वेळी लोक एकत्र येऊन दिवे लावतात आणि गोड पदार्थ चाखतात आणि देवाची प्रार्थना करतात. या दिवसाच्या विविध मूळ कथा आहेत, मुख्य म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय अशी ओळख या सणाची आहे. दिवाळी कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. काही वेळा हा दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांच्या आंघोळी असतात. या दिवशी घरातील महिला पुरुषांना तेलाने मालिश करतात. कणकेच्या दिव्याने ओवाळतात आणि उटणे लावून आंघोळही घालतात. यावेळी लावण्यात येणारे तेल हे नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन यासाठी असते मानले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. जो हे अभ्यंगस्नानकोणी हे करणार नाही तो नरकात जातो असे म्हटले जाते.

(हे ही वाचा: Diwali 2021: मान्यतेनुसार दिवाळीत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ‘हे’ नक्की करा! )

या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते असेही म्हटले जाते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता. दिवाळीतील या महत्त्वाच्या दिवशी स्त्रिया घराबाहेर रांगोळी काढून दारात आणि अंगणात पणत्या लावतात. तसेच या काळात एकमेकांकडे फराळाला जाण्याची आणि फटाके उडविण्याचे परंपरा आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करुन त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा पेटवला जातो. यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फुलांनी पूजा केली जाते.

जम्मू काश्मीर | RS पुरामध्ये BSF जवान आणि स्थानिकांनी साजरी केली दिवाळी

सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान आणि स्थानिकांनी २ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या आरएस पुरामध्ये दिवाळी साजरी केली. त्यांनी कार्यक्रमात देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर ठेका धरला आणि फटाक्यांचा आनंद लुटला.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narak chaturdashi 2021 why is narak chaturdashi celebrated ttg
First published on: 03-11-2021 at 10:05 IST