नवरात्रोत्सव सुरु व्हायच्या आधीपासून तरुणींची गरबा आणि दांडियाला काय कपडे घालायचे याची सुरुवात होते. देवीसमोर रंगणारा हा नृत्यप्रकार गुजरात, राजस्थानबरोबरच महाराष्ट्रातही तितकाच प्रसिद्ध आहे. अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्याच यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होताना दिसतात. मागील काही काळापासून मुलांचाही यामध्ये सहभाग वाढला आहे. ढोली तारो ढोल बाजे…, मैने पायल है छनकाई…यांसारख्या गाण्यांवर थिरकण्यासाठी वातावरणही तसंच हवं ना…पण मी काय घालू हा एरवीही सतावणारा प्रश्न तमाम महिलावर्गाला अशावेळी तर जास्तच त्रास देतो. मग माझ्यावर झगमगीत चनिया चोली चांगली दिसेल की सिंपल एखादा कुर्ता आणि भरजरी ओढणी? की सरळ एखादे रंगीबेरंगी हाफ जॅकेट घालू? अशा प्रश्नांनी डोके अक्षरशः भणभणायला लागते. अशा विशेष प्रसंगी आपण सुंदर दिसावे आणि आपली वेशभूषा लक्ष वेधून घेणारी असावी असे वाटणाऱ्या मुलींसाठी फॅशनच्या काही खास टिप्स…पाहूयात हटके काय करता येईल.

घागरा-चोली हा गरबा आणि दांडिया यासाठीचा ठरलेला पेहराव. यामध्ये बांधणी, टिकल्या, आरसे, जरदोसी वर्क, भरतकाम यांनी सजवलेले ड्रेस पाहायला मिळतात. मात्र याला फाटा देत सध्या हाफ जॅकेट आणि भरजरी ओढणीची फॅशन भलतीच इन असल्याचे पाहायला मिळते. अनेक मुली केवळ नवरात्रोत्सवातच हे ड्रेस घालतात आणि मग वर्षभर हे कपडे कपाटाचेच धन होऊन राहतात. तसेच ९ दिवसांपैकी किमान ३ ते ४ वेळा तरी आपल्याला या दांडिया कार्यक्रमाला जायचे असते. अशावेळी इतके महागाचे आणि भरजरी ड्रेस घेणे शक्यही होत नाही. मग थोडक्यात पण तरीही हटके फॅशन कशी करता येतील याच्या काही सोप्या ट्रीक्स जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांत उत्साहाचा एक वेगळा माहोल पाहायला मिळतो. याशिवाय आगळ्यावेगळ्या फॅशनची झलकही यानिमित्तानं अनुभवायला मिळते.

Documentary is The art of storytelling
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : गोष्ट सांगण्याची कला…
european girls mathematical olympiad marathi news, sai patil olympiad maths marathi news
शाळेत न जाता पुण्याच्या सई पाटीलने सोडवले ऑलिम्पियाडचे ‘गणित’
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?

१. फक्त घागराच नाही, तर चोलीमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. हल्ली बॅकलेस चोलीची जास्त चलती आहे. यासोबतच बाजारात स्लिव्ह्जलेस आणि डिप यू नेक अशा चोलीसुद्धा उपलब्ध आहेत.

२. पारंपारिक घागरा चोली नको असेल तर एखादा साधा घेरदार स्कर्ट त्यावर त्याला साजेल असा प्रिंटेड टॉप घालू शकता. त्यावर गडद रंगाची भरजरी ओढणी घेऊ शकता. ही ओढणी बांधण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते शिकून घेतल्यास ड्रेस सावरणे आणि खेळणे सोपे जाते.

३. सध्या बाजारात हाफ जॅकेटचीही भलतीच चलती आहे. तुम्हाला जीन्स किंवा सलवार घालायची असल्यास तुम्ही याचा नक्की विचार करु शकता. एखाद्या प्लेन कुर्त्यावर हे विविध रंगात आणि बजेटमध्ये मिळणारे हाफ जॅकेट उठून दिसते.

४. सुटसुटीत आणि सोयीस्कर असा पोषाख करायचा असेल, तर तुम्ही जीन्सऐवजी पायघोळ रंगीत प्लाजोचा वापर करू शकता. प्लाजोवर तुम्ही डेनिम शर्ट घालू शकता. तसेच प्लाजो आणि त्यावर अनारकली ड्रेस हे सुद्धा एक हटके कॉमबिनेशन आहे.

५. मुलांसाठी बाजारात कमी पर्याय असले तरीही हटके दिसण्यासाठी काही गोष्टी केल्यास स्टाइलिश दिसायला मदत होईल. यामध्ये प्रिंटेड रेडिमेड पायजमा, घेरदार शॉर्ट कुर्ता परिधान करू शकता. याशिवाय धोती त्यावर आखूड बिनबाह्याची बंडी आणि डोक्याला गुजराथी स्टाइलचा फेटा असा पारंपारिक पेहरावही तरूणांसाठी बाजारात उपलब्ध आहे. असे वेगळे काही ट्राय करायची सवय नसेल तर जीन्स आणि त्यावर एखादा लाँग किंवा शॉर्ट कुर्ता घालता येईल.

६. मेटल बेल्टची सध्या जोरदार फॅशन आहे. कंबरेला हे विविध प्रकारातील बेल्ट भलतेच हटके दिसतात. ऑक्सिडाईज आणि कॉपर बेसमधले दागिने संध्याकाळच्यावेळी आणि दांडियाच्या पेहरावावर विशेष उठून दिसतात.

७. ड्रेस वर भरगच्च नक्षीकाम असेल तर खूप वर्क असलेले दागिने घालणे टाळा. भरगच्च ड्रेसवर मॅचिंग झुमके आणि हातात बारीकसे कडे घातले तरी छान दिसेल. पायात एखादे अँक्लेटही उठून दिसेल.

८. तुम्ही साधा कुर्ता घालणार असाल तर त्यावर ऑक्साईडचा हार आणि कडे घालू शकता. स्टोनच्या नेकलेसची सुद्धा बाजारात चलती आहे. जीन्स, प्लाजो आणि टॉप या पोषाखावर तुम्ही निऑन कलरचे खडे आणि त्याला गोल्डन कलरची कडा असलेला नेकलेस घालू शकता. पण तुमच्या पेहरावास शोभून दिसतील अशी ज्वेलरी खरेदी करणे आवश्यक आहे.