नवरात्रोत्सव सुरु व्हायच्या आधीपासून तरुणींची गरबा आणि दांडियाला काय कपडे घालायचे याची सुरुवात होते. देवीसमोर रंगणारा हा नृत्यप्रकार गुजरात, राजस्थानबरोबरच महाराष्ट्रातही तितकाच प्रसिद्ध आहे. अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्याच यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होताना दिसतात. मागील काही काळापासून मुलांचाही यामध्ये सहभाग वाढला आहे. ढोली तारो ढोल बाजे…, मैने पायल है छनकाई…यांसारख्या गाण्यांवर थिरकण्यासाठी वातावरणही तसंच हवं ना…पण मी काय घालू हा एरवीही सतावणारा प्रश्न तमाम महिलावर्गाला अशावेळी तर जास्तच त्रास देतो. मग माझ्यावर झगमगीत चनिया चोली चांगली दिसेल की सिंपल एखादा कुर्ता आणि भरजरी ओढणी? की सरळ एखादे रंगीबेरंगी हाफ जॅकेट घालू? अशा प्रश्नांनी डोके अक्षरशः भणभणायला लागते. अशा विशेष प्रसंगी आपण सुंदर दिसावे आणि आपली वेशभूषा लक्ष वेधून घेणारी असावी असे वाटणाऱ्या मुलींसाठी फॅशनच्या काही खास टिप्स…पाहूयात हटके काय करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घागरा-चोली हा गरबा आणि दांडिया यासाठीचा ठरलेला पेहराव. यामध्ये बांधणी, टिकल्या, आरसे, जरदोसी वर्क, भरतकाम यांनी सजवलेले ड्रेस पाहायला मिळतात. मात्र याला फाटा देत सध्या हाफ जॅकेट आणि भरजरी ओढणीची फॅशन भलतीच इन असल्याचे पाहायला मिळते. अनेक मुली केवळ नवरात्रोत्सवातच हे ड्रेस घालतात आणि मग वर्षभर हे कपडे कपाटाचेच धन होऊन राहतात. तसेच ९ दिवसांपैकी किमान ३ ते ४ वेळा तरी आपल्याला या दांडिया कार्यक्रमाला जायचे असते. अशावेळी इतके महागाचे आणि भरजरी ड्रेस घेणे शक्यही होत नाही. मग थोडक्यात पण तरीही हटके फॅशन कशी करता येतील याच्या काही सोप्या ट्रीक्स जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. नवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांत उत्साहाचा एक वेगळा माहोल पाहायला मिळतो. याशिवाय आगळ्यावेगळ्या फॅशनची झलकही यानिमित्तानं अनुभवायला मिळते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri dandiya garba hatke fashion clothing and ornaments different combinations
First published on: 24-09-2017 at 14:11 IST