रात्रपाळीमुळे लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे शरीरात अगदी अंतर्गत पातळीवरही त्याचे वाईट परिणाम होतात. मानवी शरीरातील डीएनए बिघडले तर त्यांची निसर्गत: दुरुस्ती होत असते, पण हे दुरुस्तीचे काम रात्रपाळीमुळे बंद पडते. परिणामी अनेक आजार होतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील डय़ुक विद्यापीठातील वैज्ञानिकांनी सांगितले, की डीएनए दुरुस्त्या या आजारांपासून दूर राहण्यासाठी उपयोगी असतात. त्या पेशीतील प्रक्रियांमुळे घडत असतात. रात्रपाळी करणारे लोक दिवसा झोपतात त्यामुळे त्यांच्या मूत्रात डीएनए दुरुस्तीमुळे तयार होणारे ८ ओएच डीजी हे रसायन कमी दिसते. रात्री झोपेने डीएनए दुरुस्ती चांगल्या प्रकारे होत असते. नवीन अभ्यासानुसार रात्रपाळी करणाऱ्या २२३ लोकांपैकी ५० जणांच्या मूत्राचे परीक्षण करण्यात आले असता त्यात हे रसायन वेगवेगळ्या प्रमाणात दिसले. रात्रपाळीमुळे मेलॅटोनिनवर परिणाम होऊन झोप बिघडते. रात्रपाळी करणाऱ्या लोकांच्या मूत्रात मेलॅटोनिन फार कमी दिसले, तर रात्री झोपणाऱ्यांमध्ये ते जास्त दिसले. दारूचे सेवन व साडेपाच तासांपेक्षा कमी झोप यामुळे प्रकृतीवर परिणाम होतात. जे लोक रात्री झोपतात, त्यांच्या तुलनेत रात्रपाळी करणाऱ्यांत ८ ओएच डीजी रसायन २० टक्के कमी असते. मेलॅटोनिन कमी झाल्याने ८ ओएच डीजी रसायन कमी दिसते, असे फ्रेड हचिनसन कॅन्सर रीसर्च सेंटरचे परवीन भट्टी यांनी सांगितले. एनईआर हा एक मार्ग डीएनए दुरुस्तीत महत्त्वाचा असतो, त्याचा आरोग्य बिघडण्याशी संबंध असू शकतो. ऑक्सिजनच्या मुक्त कणांमुळे डीएनए नादुरुस्त होत असतात. मेलॅटोनिनमुळे एनईआर मार्गिका व्यवस्थित चालते व त्यामुळे झोप येऊ शकते, असे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night shift work effect on sleep dna issue
First published on: 28-06-2017 at 03:29 IST