मोबाईल फोन्समधून निघणाऱ्या लहरी मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या असतात की नाही,  याबद्दल जगात अनेक मतप्रवाह आहेत. मात्र, नुकत्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांनी मोबाईल फोन किंवा मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरींचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. मोबाईलच्या वापरामुळे उत्पन्न होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे धोकादायक आजार होऊ शकतात, अशी विधाने कोणत्याही शास्त्रीय आधाराविना केली जातात असे मत सीओएआय संघटनेने आयोजित केलेल्या परिषदेत मांडण्यात आले. काही लोकांकडून निव्वळ व्यवसायिक लाभासाठी अशाप्रकारच्या अफवा समाजात पसरवल्या जातात. चुंबकीय विद्युत क्षेत्राच्या संपर्कात आल्याने लोकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे, जगभरातील काटेकोर आणि स्वतंत्र संशोधनातून अनेकदा निष्पन्न झाल्याचेसुद्धा यावेळी सांगण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पाहणीनुसार, जगभरात सध्या ६०० कोटी लोक मोबाईल फोनचा उपयोग करतात. मोबाईलसाठी वापरण्यात येणाऱ्या चुंबकीय विद्युत लहरी या  अत्यंत कमी क्षमतेच्या असून, त्यामुळे मानवी आरोग्याला कोणताही गंभीर धोका उद्भवू शकत नसल्याची माहिती टाटा वैद्यकीय केंद्राचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट राकेश जलाली यांनी दिली.   

Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो