नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD ग्लोबलने फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला (दि.१०) भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन Nokia 5.4 आणि Nokia 3.4 लाँच केले. Nokia 5.4 आणि Nokia 3.4 दोन्ही बजेट स्मार्टफोन आहेत. यातील Nokia 5.4 फोनची विक्री यापूर्वीच सुरू झाली आहे. तर आजपासून  Nokia 3.4 या फोनच्या विक्रीला सुरूवात होत आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाटवर दुपारी 12 वाजेपासून फोनच्या सेलला सुरूवात होईल. याशिवाय नोकियाची अधिकृत वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुनही फोन खरेदी करता येईल. Nokia 3.4 मध्ये तीन रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आणि पंचहोल डिस्प्लेही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nokia 3.4 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia 3.4 फोनमध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जी स्टोरेज मिळेल. मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये तीन रिअर कॅमेरे असून मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा, दुसरा 5 मेगापिक्सेल आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. तर, सेल्फीसाठी पुढे 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर हे फिचरही आहे. Nokia 3.4 मध्येही कंपनीने 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

Nokia 3.4 ची भारतात किंमत :
Nokia 3.4 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. हा फोन चारकोल, डस्क आणि Fjord अशा तीन कलरच्या पर्यायांत उपलब्ध असेल.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia 3 4 goes on sale in india today check price in india and specifications sas
First published on: 20-02-2021 at 11:41 IST