नोकियाची मालकी असलेल्या HMD Global ने काही दिवसांपूर्वीच भारतात आपले नवीन Nokia Power Earbuds Lite लाँच केले होते. आजपासून या इअरबड्सच्या विक्रीला सुरूवात झालीये. Nokia.com/phones आणि Amazon.in या दोन संकेतस्थळांवरुन नोकियाचे नवीन इअरबड्स खरेदी करता येतील. इअरबड्ससोबत कंपनीकडून एका वर्षांची वॉरंटी मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिझाइन, फिचर्स :-
नोकिया पॉवर ईअरबड्स लाइट प्रीमियम नॉर्डिक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. 600 mAh बॅटरी असलेल्या एका पॉकेट साइज चार्जिंग केसमध्ये हे इअरबड्स येतात. स्नो आणि चारकोल अशा दोन रंगांचे पर्याय या इअरबड्ससाठी आहेत. क्रिस्टल-क्लिअर ऑडिओसह येणाऱ्या नोकिया पॉवर इअरबड्स लाइटला ब्लूटूथ सपोर्ट आहे. कानात योग्यपणे हे इअरबड्स फिट बसतात आणि यांना कंट्रोल करणंही सोपं आहे.

35 तासांपर्यंत बॅकअप :-
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हे इअरबड्स 35 तासांपर्यंत प्ले-टाइम बॅकअप देतात असा दावा कंपनीने केला आहे. नोकिया पॉवर ईअरबड्स लाइटला IPX7 रेटिंग मिळाली आहे, म्हणजे 1 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत ठेवल्यावरही हे इअरबड्स खराब होत नाहीत.

किंमत :-
3,599 रुपये इतकी नोकिया पॉवर इअरबड्स लाइटची किंमत ठेवण्यात आली आहे. भारतीय मार्केटमध्ये नोकियाच्या नवीन इअरबड्स लाइटची वनप्लस बड्स (जवळपास 4 हजार 990 रुपये), शाओमी एमआय ट्रू वायरलेस इअरफोन 2 (जवळपास 3 हजार 599 रुपये) आणि न्यू रिअलमी बड्स एअर 2 (जवळपास 3 हजार 299 रुपये) यांच्यासोबत टक्कर असेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia power earbuds lite sale starts in india check price specifications and other details sas
First published on: 26-02-2021 at 16:12 IST