माझे वजन खूप वाढले आहे त्यामुळे मी आता जिम लावणार , आता जिम लावली नाही तर माझे काही खरे नाही, असे म्हण अनेकजण उत्साहात व्यायामशाळेत प्रवेश घेतात. मात्र, काही दिवस उलटल्यानंतर आपल्याला नियमित व्यायामाचा कंटाळा येतो. त्यामुळे जिममध्ये नियमितपणे जाणे होत नाही. मात्र, जिम सोडल्यास वजन वाढण्याची भीती अनेकांना सतावत असते. पण यामागे नेमके काय कारण असते? खरंच वजन वाढते का? या गोष्टीचा शरीरावर काय परिणाम होतो याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दररोजच्या जिमच्या व्यायामामुळे शरीरात अनेक बदल होतात. जिमच्या व्यायामामुळे मांसपेशी तुटतात. या तुटलेल्या मांसपेशी रिपेअर करण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते. त्यामुळे जिमवरुन आल्यावर भूक लागते. यावेळी शरीराला योग्य ते पोषण मिळाले नाही तर शरीरातील उष्मांक साठून राहतात. दुसऱ्या दिवशी जिमला गेल्यावर साठून राहीलेल्या कॅलरीज जाळल्या जातात. जिमला जाणे बंद केल्यावर त्याला पर्यायी व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र, तसे न केल्याने आपण जो आहार घेतो त्यातील उष्मांक जळण्याची क्रिया बंद होते. हा उष्मांक पोटावर चरबीच्या रुपात साठून राहतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One will gain weight after leaving the gym is it true or not
First published on: 08-11-2017 at 11:30 IST