बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘वन प्लस सिक्स टी’ या स्मार्टफोनच्या विक्रीला आजपासून सुरूवात होत आहे. या शानदार स्मार्टफोनचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच अनेक आकर्षक ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.

अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर मध्यरात्री 12 वाजेपासून हा सेल सुरू झाला आहे. याशिवाय वन प्लसचं अधिकृत संकेतस्थळ, क्रोमा स्टोअर्स किंवा रिलायंस डिजीटल स्टोअर्समध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. याच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 37 हजार 999 रुपये आहे. टॉप व्हेरिअंटची म्हणजेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 45 हजार 999 रुपये आणि मध्यम व्हेरिअंट म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 41 हजार 999 रुपये आहे.

rbi ban on online customer registration and credit card distribution to kotak mahindra
कोटक महिंद्र बँकेवर निर्बंध; ऑनलाईन ग्राहक नोंदणी व क्रेडिट कार्ड वितरणावर रिझर्व्ह बँकेची बंदी
Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक

ऑफर्स –
– सीटीबँक अथवा आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 2 हजार रुपयांचा कॅशबॅक
– रिलायंस जिओकडून 5 हजार 400 रुपये कॅशबॅक आणि 3 टीबी 4जी डेटा
– अॅमेझॉन-पेवर 1 हजार रुपयांचा कॅशबॅक
– नो-कॉस्ट इएमआयची सुविधा

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
वन प्लसच्या या नवीन फोनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे फोनच्या ६.४ इंच स्क्रीनवर असलेला वॉटरड्रॉप स्टाइलचा नॉच. वन प्लसच्या युझर्सने दिलेल्या सुचनेनुसार हा बदल करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. फोनला ६.४ इंचाची फूल एचडी ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरवर हा फोन काम करेल. फोनमध्ये ६ जीबी तसेच ८ जीबी रॅमचा आणि १२८ जीबी तसेच २५६ जीबी इंटरनल मेमरी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या फोनचे बेसिक  व्हेरिअंट कंपनीच्या आधीच्या फोनप्रमाणे ६४ जीबी इंटरनल मेमरी ऐवजी थेट १२८ जीबी इंटरनल मेमरीपासून सुरु होईल. वन प्लस सिक्स टीमध्ये तीन कॅमेरा असतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र फोनमध्ये केवळ दोनच कॅमेरा असतील असे कंपनीने लॉन्च इव्हेंटमध्ये स्पष्ट केले आङे. रेअर कॅमेरा हा २० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स३७६के सेन्सर्स असणार असेल तर फ्रण्ट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स५१९ सेन्सर्सचा असेल.फोनमध्ये स्टुडिओ लायटनिंग आणि नाईट्स्केप हे दोन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. पोर्टेट मोडमध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो काढताना त्याच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश किती असावा हे स्टुडीओ लायटिंगच्या मदतीने ठरवता येईल तर कमी प्रकाशात फोटो काढताना म्हणजेच एचडीआर मोडच्या मदतीने अगदी दोन सेकंदात फोटो काढण्यासाठी नाईट्स्केप फिचर वापरता येईल. फोनमध्ये ३७०० एमएएचची बॅटरी आहे. कंपनीचा सध्याचा प्लॅगशिप फोन असणाऱ्या वन प्लस सिक्सच्या बॅटरीपेक्षा ही बॅटरी ३७ टक्क्यांनी जास्त शक्तीशाली आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी हा फोन खास असेल कारण यामध्ये स्टेबिलायझर म्हणजे फोनमधील ग्राफिक्स स्थिर राहण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा फोन अॅण्ड्रॉइड ९ पायवर काम करेल. या फोनमध्ये स्मार्ट बुस्टर हे विशेष फिचर उपलब्ध करुन देण्यात आले असून यामुळे मोबाइलच्या रॅम तसेच रॉमवर पडणारा ताण कमी करुन बुटिंगसाठी लागणारा वेळ कमी करता येईल. फोनला एनएफसी आणि फोर जी व्होल्ट कनेक्टीव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत.