Oppo कंपनीने 12 जून रोजी आपला लेटेस्ट स्मार्टफोन Oppo A52 भारतात लाँच केला. ओप्पोचा हा ‘बजेट’ स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे. 17 जूनपासून या स्मार्टफोनची भारतात ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री सुरू होणार आहे. Oppo A52 या फोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. तर, समोर सिंगल सेल्फी कॅमेरा होल-पंच डिस्प्लेमध्ये सेट करण्यात आलाय. 5,000 एमएएच क्षमतेची पॉवरफुल बॅटरी असलेल्या या फोनमध्ये हायपरबूस्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात हा स्मार्टफोन सर्वात आधी चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंमत:-
6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 990 रुपये आहे. सध्या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. पण, कंपनीने लवकरच 4GB + 128GB आणि 8GB + 128GB अशा दोन व्हेरिअंटमध्येही हा फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.

स्पेसिफिकेशन्स :-
हा फोन Android 10 वर आधारित ColourOS 7.1 वर कार्यरत आहे. यामध्ये 6.5 इंच (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असून ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 665 चिपसेट आहे. तर, 8 जीबी LPDDR4x रॅम असलेल्या या फोनमध्ये मागील बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी कॅमेरा 12-मेगापिक्सल सेंसर आणि सेकंडरीमध्ये 8-मेगापिक्सल सेंसरचा समावेश आहे. फ्लॅशसह हे चार कॅमेरे आयताकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये सेट करण्यात आले आहेत. अन्य दोन कॅमेरे 2-मेगापिक्सलचे सेंसर आहेत. तर फ्रंटमध्ये एक 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय, एलटीई, ब्लूटूथ, एक 3.5 मिलिमीटर हेडफोन जॅक आणि चार्जिंगसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. याशिवाय, 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी यात आहे. 192 ग्रॅम वजन असलेला या फोनला साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे, म्हणजे सेंसर पावर बटणमध्ये फिट करण्यात आले आहेत.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo a52 sale in india starts from 17th june get price specifications and all other details sas
First published on: 15-06-2020 at 16:34 IST