पॅन कार्ड मिळवणं आता अधिक सोपं होणार आहे. अर्ज केल्याच्या काही मिनिटांमध्येच पॅन कार्ड तुमच्या हातात मिळेल. आयकर विभाग लवकरच पॅनकार्ड बनविण्यासाठी नवी सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पुढील काही आठवड्यांमध्ये ही नवी सेवा सुरू होईल. या नव्या सेवेचा फायदा अर्जदारासोबतच ज्यांचं पॅन कार्ड हरवलंय किंवा डुप्लिकेट पॅनकार्डसाठी ज्यांनी अर्ज केलाय त्यांनाही होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रॉनिक पॅन अर्थात ePAN सुविधा सर्व अर्जदारांसाठी मोफत असेल. ePAN तयार करताना आधार कार्डवरील माहिती पडताळली जाईल, त्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर आधारवरील नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती ऑनलाइन अॅक्सेस केली जाईल. PAN card तयार करण्यासाठी ठराविक माहिती वगळता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. एकदा PAN जनरेट झाल्यानंतर अर्जदाराला एक डिजिटल स्वाक्षरी असलेलं ePAN दिलं जाईल. यामध्ये एक QR कोड असेल. फसवणूकीला आळा घालण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती इनक्रिप्ट केली जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pan card now get instant e pan income tax department new service sas
First published on: 05-11-2019 at 15:03 IST