Parenting Tips: मुलं खूप निरागस असतात आणि त्यांना खेळायला खूप आवडतं. लहान वयात मुलांची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. लहान मुलं म्हणजे आपल्या घराचं तेज. पालकांना किंवा नातेवाईकांना मुलांचे हसणे आणि खेळणे खूप आवडते.मुलांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक वेळा पालक मुलांना हवेत जोरात उडवतात. हे तुम्ही तुमच्या घरातच नाहीतर बाहेरही अनेकदा पाहिलं असेल. यावेळी मुलेही हसतात. पण तुम्हाला माहित आहे का की असे करणे तुमच्या मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे मुलांचा जीवही जाऊ शकतो, त्याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो आणि तुमचे मूल शेकन बेबी सिंड्रोमचे बळी ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळाला हवेत झेलण्याचे तोटे –

डॉक्टरांच्या मते, जेव्हा तुम्ही मुलांना हवेत झेलता तेव्हा त्याचे डोके मागे जाते. बऱ्याच वेळी त्यांचा मेंदू देखील हलू शकतो. मेंदूची वाढ थांबू शकते, यासोबतच न्यूरोलॉजिकल आजारांचाही धोका असतो. आणि सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे हे आजार सहजासहजी डिटेक्ट होत नाहीत.

डॉक्टरांचं मत काय? –

लहान मुलं खूप नाजूक असतात. त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग हा सध्या कमजोर आहे कारण, त्याच्या शरिराची वाढ होत आहे. २ वर्षांखालील मुलांच्या मानेचे हाड खूप कमकुवत आणि लवचिक असते. यासोबतच मुलांना आपल्या शरीरावर नियंत्रण कसे ठेवावे हे देखील कळत नाही.अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही मुलांना हवेत झेलता तेव्हा त्यांना अंतर्गत इजा होण्याचा धोका असतो. या दरम्यान, मुलांच्या मेंदूचे नुकसान होऊ शकते आणि त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.

शेकन बेबी सिंड्रोमची लक्षणे –

  • जास्त चिडचिड होणे
  • श्वासोच्छवासाच्या समस्या
  • उलट्या
  • फिकट गुलाबी किंवा निळा त्वचेचा रंग
  • बेशुद्ध पडणे
  • कोमा आणि अर्धांगवायू
  • हाडे आणि बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर
  • डोळ्याच्या आत रक्तस्त्राव

हेही वाचा – Remove old tattoos: काही क्षणांत घालवा पर्मनंट टॅटू; हे घरगुती पर्याय ठरु शकतात फायदेशीर

बचाव कसा करायचा –

सर्वात आधी तुम्ही मुलाला हवेत झेलणे टाळले पाहिजे आणि शेकन बेबी सिंड्रोमची लक्षणे दिसली तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा,

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parenting tips catching children in the air is a dangerous can effect kid badly srk
First published on: 28-04-2023 at 18:31 IST