मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरली जाणारी पिपली हे उपयुक्त औषध आहे. आयुर्वेदानेही पिपलीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. याच पिपलीचा उपयोग कर्करोगावरील उपचारात केला जाणार आहे. नव्या संशोधनानुसार पिपली हे कर्करोगाच्या उपचारात उपयुक्त औषध आहे.

टेक्सास विद्यापीठाच्या वैद्यकीय संशोधकांनी यावर उपयुक्त संशोधन केले आहे. कर्करोगाच्याा गाठीमध्ये एन्झायमा हे द्रव्य आढळते. पिपलीमध्ये उपयुक्त रसायन असते, जे एन्झायमाची निर्मिती थांबवते. त्यामुळे कर्करोगाचा संभाव्य धोका टळतो.

भारतामध्ये पिपलीचे महत्त्व अधिक असून मसाल्यात या औषधी पदार्थाचा नियमित वापर असतो. कर्करोग होऊ नये म्हणून आहारात पिपलीचे प्रमाण असावे, असे हे संशोधक सांगतात. पिपलीमध्ये पायपरलाँगूमाइन (पीएल) नावाचे द्रव्य असते, त्यामुळे प्रोस्टेट, स्तन, फुप्फुस, मोठे आतडे, रक्त, ब्रेन टय़ुमर, जठर यांचा कर्करोग होण्याचा धोका संभवत नाही.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)