Hill stations : देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडला हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही त्याच्या सौंदर्यामुळे पर्यटकांनी वेढलेले असते. प्रत्येक ऋतूमध्ये उत्तम असतो. उन्हाळ्यात लोक उन्हापासून आराम मिळावा म्हणून येथे येतात, तर हिवाळ्यात ते बर्फाच्छादित पर्वत रांगा पाहण्यासाठी आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येतात. तुम्हीही जर या हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर उत्तराखंडच्या या हिल स्टेशनला भेट देऊ शकता.

उत्तराखंडचे हिल स्टेशन

औली (औली हिल स्टेशन) – उत्तराखंडमधील बर्फाळ हिल स्टेशन पाहण्यासाठी औली हे एक उत्तम ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासू २,५०० मीटर ते ३,५०० मीटरच्या दरम्यान, हे हिल स्टेशन स्नोबोर्डिंग आणि स्कीइंगसाठी(Snowboarding and skiing) सर्वोत्तम ठिकाण आहे. तसेच, ते बद्रीनाथ मंदिराजवळ आहे. हे नंदा देवी, कामेत, मान पर्वत आणि दुनागिरीसह काही सर्वोच्च हिमालयाच्या शिखरांचे सुदर दृश्य देखील पाहता येते.

जान्हवी कपूरला आवडते ‘जल तत्व ध्यान’! खरंच पाण्याचा आवाज ऐकून ध्यान करणे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

चौकोरी हिल स्टेशन – उत्तराखंडमधील हे एक अद्वितीय हिल स्टेशन आहे जिथे सूर्यास्त आणि सूर्योदय दोन्ही अतिशय सुंदर दिसतात. हे समुद्रसपाटीपासून २०१० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे तुम्हाला हिल स्टेशन देवदार, ओक आणि रोडोडेंड्रॉनची झाडे, मक्याची शेते आणि हिरव्यागार बागा आढळतील. तुम्हाला येथे मोठ्या चहाच्या बागाही पाहायला मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनोल्टी हिल स्टेशन – उंच हिमालयाच्या मधोमध वसलेले, हे शांत डोंगराळ शहर पर्यटकांना विविध अनुभव घेण्याची संधी देते. किल्ले, मंदिरे अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. याशिवाय कॅम्पिंग आणि साहसी उपक्रम आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण उत्तम आहे.