Poco M2 Pro हा ‘पोको’ ब्रँडअंतर्गत तिसरा स्मार्टफोन भारतात गेल्या महिन्यात लाँच झाला.  नवीन Poco स्मार्टफोनमध्ये होल-पंच डिस्प्ले आणि क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. एकूण पाच कॅमेरे असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि RAW मोड यांसारखे अनेक कॅमेरा मोड आधीपासून देण्यात आले आहेत. भारतीय मार्केटमध्ये हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून आज(दि.6) हा फोन पुन्हा एकदा सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टच्या वेबासाइटवर दुपारी 12 वाजेपासून या फोनसाठी सेल सुरू होईल. सेलमध्ये ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे फोन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल. ंयाशिवाय ‘प्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’वर पाच टक्के सूट आहे. तसेच ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Poco M2 Pro फीचर्स :-
ड्युअल सिम सपोर्ट असलेला Poco M2 Pro अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 for Poco वर कार्यरत आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.67 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला असून 6 जीबीपर्यंत LPDDR4X RAM आहे. पोको एम2 प्रोमध्ये चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल लेंन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोड सपोर्ट असलेला 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 128 जीबी मेमरी असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेल्या या फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.

किंमत :-
पोको एम2 प्रोच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमधील सर्वात पॉवरफुल व्हेरिअंट म्हणजे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. आउट ऑफ द ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि टू शेड्स ऑफ ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poco m2 pro to go on sale today in india via flipkart check price specifications and offers sas
First published on: 06-08-2020 at 10:38 IST