दक्षिण कोरियाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने आज आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची नवी गॅलेक्सी ‘एस १०’ सिरिजचे तीन फोन लॉन्च केले. ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर उद्यापासून (दि.२१) या स्मार्टफोनसाठी आगाऊ नोंदणी सुरू होत आहे. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळानुसार सकाळी १० वाजेपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे. मात्र, कोणत्या व्हेरिअंटसाठी प्री-बुकिंग होणार आहे आणि कोणत्या व्हेरिअंटसाठी नाही याबाबत काहीही माहिती फ्लिपकार्टवर देण्यात आलेली नाही, किंवा फोनसाठी खरेदी केव्हापासून सुरू होणार याचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. सामान्यतः सॅमसंग कंपनी ग्लोबल लाँचिंगनंतर लगेचच भारतात आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करते, त्यामुळे या तिन्ही फोनसाठी प्री-बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील सॅन फ्रँसिस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या UNPACKED 2019 इव्हेंटमध्ये कंपनीने आपले नवीन फोन लॉन्च केले आहेत. Galaxy S10, Galaxy S10 आणि Galaxy S10E या तीन मॉडेल्सचा समावेश आहे. एस सिरिजच्या स्मार्टफोनला वायरलेस चार्जिंग सपोर्ट सिस्टिम सपोर्ट करणार आहे. एस सिरिजशिवाय फोल्डेबल स्मार्टफोन, वायरलेस इयरफोन आणि गॅलेक्सी वॉच अॅक्टिवही लाँच करण्यात येणार आहे

यावेळी कंपनीने आपल्या ग्राहकांना इतर स्मार्टफोनच्या तुलनेत काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसागणिक बाजारात नवनवीन तंत्रज्ञानाचे मोबाईल दाखल होत असताना सॅमसंगनेही आपली ‘एस’ सिरीज बाजारात दाखल केले आहे. त्यामुळे तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. अमिरेकेत या फोनची विक्री ८ मार्चपासून सुरू होणार आहे. तर भारतीय बाजारात Samsung Galaxy S10 पुढील महिन्यात ६ मार्चला लाँच केला जाणार असून त्याची विक्री १५ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

     स्मार्टफोनची बॅटरी –
  • आज लाँच झालेल्या तिन्ही स्मार्टफोनपैकी सर्वात ताकदवान बॅटरी गॅलेक्सी एस १० प्लसमध्ये आणि सर्वात कमी क्षमतेची बॅटरी Galaxy S10E मध्ये देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस१० ईमध्ये 3,100mAh, सॅमसंग गॅलेक्सी एस१०मध्ये 3,400mAh आणि सॅमसंग गॅलेक्सी एस१० प्लसमध्ये 4,100mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • डिस्प्ले आकार आणि प्रोसेसर –
    या तिघांपैकी सर्वात छोट्या आकाराचा फोन Galaxy S10E असेल आणि सर्वात मोठ्या आकाराचा फोन एस१० प्लस असणार आहे हे नावावरुनच आपल्या लक्षात येईल. Galaxy S10 Plus मध्ये ६.४ इंच इनफिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंग Galaxy S10E मध्ये ५.८ इंच डिस्प्ले असेल. गॅलेक्सी एस १० बाबत सांगायचे झाल्यास, यात ६.१ इंच इनफिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे. या तिन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ एसओसी (SoC) प्रोसेसर देण्यात येईल असा अंदाज आहे.
  • किंमत –
    Galaxy S10 सिरिजची किंमत ८९९ डॉलरपासून सुरूवात होईल. तर S10 Plus ची किंमत ९९९ डॉलर असणार आहे. Galaxy S10Eची किंमत ७४९ डॉलर असणार आहे.
  • कॅमेरा –
    Galaxy S10, Galaxy S10 Plus – या स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरे असणार आहेत. त्यापैकी दोन १२ मेगापिक्सल तर एक १६ मेगापिक्सल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी अनुक्रमे ८ आणि १० मेगापिक्सल कॅमेरे देण्यात आले आहेत.

         Galaxy S10E – दोन रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. त्यामधील एक लेन्स १२ मेगापिक्सल तर दुसरा १६ मेगापिक्सल असणार                 आहे. सेल्फीसाठी १० मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

  • मेमरी आणि स्टोरेज –
    Galaxy S10, Galaxy S10 Plus – 8GB आणि 12GB अशा दोन रॅममध्ये हे फोन उपलब्ध असणार आहेत. तसेच इंटर्नल मेमरी(स्टोरेज) अनुक्रमे 128GB आणि 512GB असे दोन्ही फोन उपलब्ध असणार आहेत. Galaxy S10 Plusची इंटर्नल मेमरी 1TB पर्यंत सपोर्ट करू शकणार आहे.
    Galaxy S10E – 6GB आणि 8GBअशा दोन रॅममध्ये फोन उपलब्ध असणार आहेत. तसेच इंटर्नल मेमरी(स्टोरेज) अनुक्रमे 128GB आणि 256GB असे दोन फोन देण्यात आले आहेत.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre bookings for galaxy s10 s10plus and s10e from feb 22 on flipkart
First published on: 21-02-2019 at 16:06 IST