तुम्ही तुमच्या आवडत्या आउटलेटवर खरेदी केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर दुकानदार तुम्हाला कागदी बिल पावती देतो. पण, या कागदी पावत्या आपण अनेकदा फोल्ड करून बॅगमध्ये ठेवतो किंवा खूप वेळ हातात घेऊन खेळ करत राहतो. अनेकदा या पावत्या लहान मुलांच्या हातात खेळण्यासाठी दिल्या जातात, पण या पावत्या आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे समोर आले आहे; त्यामुळे या कागदी पावत्यांना स्पर्श करणे टाळलं पाहिजे. या पावत्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चमकदार प्लास्टिकच्या कागदाला थर्मल पेपर असे म्हणतात. त्यावर अक्षरं मुद्रित करण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो, अशी माहिती iThrive संस्थापक आणि सीईओ फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान यांनी दिली.

बिस्फेनॉल ए (बीपीए) आणि बिस्फेनॉल एस (बीपीएस) ही घातक मुख्य रसायने आहेत, जी या प्रकारच्या कागदाच्या थर्मल कोटिंगमध्ये वापरली जातात. बीपीए आणि बीपीएस दोन्ही विघटनकारी रसायने आहेत, यामुळे ते व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन प्रणालीत अडथळा निर्माण करू शकतात, असे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मुंबईतील मिरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटल्समधील कंसल्टंट इंटरनल मेडिसिन डॉ. अनिकेत मुळे म्हणाले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why sjr
First published on: 18-04-2024 at 00:56 IST