मोदी सरकारने व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी आधार कार्ड तुमच्या बँक खात्यांशी आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक करावा असे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसादही दिला. ३१ डिसेंबरपर्यंत बॅंक खात्याशी आधार क्रमांक लिंक न झाल्यास तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रांझॅक्शन होणार नाही, त्यामुळे वेळेत आधारकार्ड लिंक करा असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले. आता यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया आपण केलेली असली तरीही प्रत्यक्षात हे काम झाले आहे की नाही, हे समजण्यासाठी सरकारने आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. एका क्लीकवर ही गोष्ट तुम्हाला तपासता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्या मोबाईलवरून  *99*99# कोड डायल करा. स्क्रीनवर काही सूचना येतील. त्यानुसार तुम्हाला पुढील माहितीसाठी १ क्रमांक डायल करायचा आहे. त्यानंतर तुमचा आधारकार्ड क्रमांक विचारला जाईल. तो टाकल्यानंतर तुम्हाला आलेला सिक्रेट कोड डायल केल्यास तुमच्या मोबाईल स्क्रीनवर सारी माहिती दिसेल. तुमचा क्रमांक बॅंक खात्याशी लिंक आहे की नाही हे त्यानंतर मोबाईल स्क्रीनवर समजेल. मात्र यासाठी आधारकार्डच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस मोबाईल क्रमांक दिलेला असायला हवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Process of knowing your aadhaar card number linking with bank account
First published on: 27-11-2017 at 13:17 IST