Monsoon Cleaning Hacks: पावसाने मागील काही आठवड्यांपासून राज्याला अक्षरशः झोडपून काढले होते. मागील दोन दिवसांपासून पावसाने जरा उसंत घेतली आहे. पण हावामान खात्याच्या अंदाजानुसार तसेच ज्योतिषीय तर्काने पावसाचे नक्षत्र बदलताच पुढील काहीच दिवसात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी काही समस्या या वर्षानुवर्षे एखादी परंपरा असल्याप्रमाणे आपल्यासमोर येऊन उभ्या राहतातच. जसे की पावसाळ्यामुळे घरातील भिंतींना ओल धरणे, लादी चिकट होणे, अंथरूण- पांघरुणाला कुबट वास येणे इत्यादी. आता या समस्यांवर आपण निदान धुवून- पुसून- वाळवून उपाय करू शकतो पण घरातील भल्या मोठ्या कापसाच्या गाद्या व उशांचं काय करायचं? साहजिकच त्यात कापूस असल्यामुळे त्यांच्यावर पाणी वापरून धुवून काढणे शक्य नाही, उन्हात छान वाळत घालाव्यात तर उन्हाचा काही मागमूसच नाही. मग अशावेळी घरभर पसरणारा कुजल्यासारखा वास कसा घालवायचा?
आज आपण घरातील उशी व गादी स्वच्छ करण्याचे काही सोपे, कमी वेळ खाऊ आणि महत्त्वाचे म्हणजे स्वस्त उपाय पाहणार आहोत. अवघ्या पाच ते दहा मिनिटात आपण हे उपाय करून पाहू शकता.
पावसामुळे उशी- गादीला येणारा कुबट वास कसा घालवावा?
१) पावसाळ्यात एक दिवस आड रात्री झोपण्याच्या आधी हेअर ड्रायर उशीवर फिरवा, यातील उष्ण हवेमुळे आद्रता कमी होण्यास मदत होईल. आपण याऐवजी उशीवर इस्त्री सुद्धा फिरवू शकता.
२) बेकिंग सोडा हा दुर्गंधी घालवण्याचा नामी उपाय आहे. आपण उशीचे कव्हर काढून त्यावर थोडा बेकिंग सोडा पसरवून ठेवा, यामुळे पाण्याचे दव शोषून घेतले जातात. नंतर किंचित पाणी स्प्रे करून हा बेकिंग सोडा पुसून काढा.
३) तुम्ही एका स्प्रे बॉटल मध्ये पांढरे व्हिनेगर घेऊन उशीवर स्प्रे करू शकता, यानंतर उशीला थोड्यावेळ पंख्याची हवा लागू द्या.
४) ऍक्टिव्हेटेड चारकोल हा दुर्गंधी घालवण्याचा उत्तम मार्ग आहे. मात्र हे चारकोल आपण थेट उशीवर टाकू नये, कारण त्याने डाग लागू शकतो, एखाद्या छोट्या कापडी पिशवीत टाकून आपण चारकोल कापसात ठेवू शकता.
हे ही वाचा<< खोबरेल तेलात फक्त ‘ही’ एक गोष्ट टाकून पहा कमाल; पांढरे केस काहीच दिवसात होतील काळेभोर
५) अलीकडे अनेक प्रकारच्या रूम फ्रेशनर टॅबलेट सुद्धा बाजारात उपलुब्ध आहेत आपण डांबर गोळ्याप्रमाणे या टॅबलेट पिशवीत बांधून उशी मध्ये ठेवू शकता.