पावसाळा म्हटलं की छान थंडगार हवा, रिमझिम पाऊस असतो. अशा वातावरणात अनेकजण मित्रमंडळींबरोबर लाँग ड्राइव्हला, पिकनिकला जायचे प्लॅन्स करत असतात. तर काहींना रेग्युलर ऑफिस, मीटिंग अटेंड करायच्या असतात. अशा वेळी कोणत्या प्रकारचे फुटवेयर घालायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या फॅशनचे फुटवेयर परिधान करायचे..
१.स्नीकर्स
कोणत्याही कपड्यांवर साजेसे असे फुटवेयर म्हणजे स्नीकर्स. मग तो पावसाळा असो वा उन्हाळा स्नीकर्सची फॅशन कायम असते. स्नीकर्स पावसाळ्यात पायांचे संरक्षण करतात. ट्रेण्डी लुकमधील स्नीकर्स खास पावसाळ्यानिमित्त बाजारात पाहायला मिळत आहेत. हे स्नीकर्स खास मान्सून फ्रेण्डली मटेरिअलपासून बनले आहेत आणि पायाला कम्फर्टेबल आहेत. या स्नीकर्सचा वापर ट्रेकिंगला जाताना, पिकनिकला जाताना केला जाऊ शकतो. स्नीकर्समध्ये पार्टीवेयर आणि कॅज्युअल स्नीकर्स असे दोन प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहेत.
२.अँकल बूट्स
कोणत्याही आऊटफिटबरोबर घातले जाणारे बूट्स म्हणजे अँकल बूट्स. पिकनिकला किंवा आऊटिंगला जाताना हाफ पॅण्ट, नी लेन्थ ड्रेस, याबरोबर हे अँकल बूट्स शोभून दिसतात. तसेच कॉलेज, ट्रेक, इन्फॉर्मल मीटिंगला जाताना रबरी अँकल बूट्स अगदी साजेसे असतात. अॅंकल बूट घातल्याने पायाचे संरक्षण होते त्याच बरोबर फॅशन स्टेटमेंट म्हणून सुद्धा अगदी योग्य दिसतात. ब्लॅक, ब्राऊन, मरून हे कलर मधील अॅंकल बूट्स नेहमीच चांगले दिसतात.
३.ब्लॉक हिल्स
ब्लॉक हिल्स प्रत्येक सिझनमध्ये ट्रेंडी असतात. मुळातच क्लासी असलेली हे ब्लॉक हिल फूटवेयर एखाद्या फॉर्मल ड्रेसबरोबर किंवा रेनीजॅकेट आणि पॅण्ट्सबरोबर खूप मस्त दिसतात. तसेच बॉक्स हिल्स फुल शर्ट, कुर्ती, कुलॉट्स, डेनिम्स यावर देखील मस्त दिसते. हा ऑफिससाठी अगदी साजेसा लूक आहे. ब्लॉक हिल्समध्ये नेवी ब्लू, ब्राऊन, व्हाइट, ऑकर हे रंग खूप चांगले दिसतात.