रिअलमी कंपनीने भारतात आपली स्मार्टफोनची नवीन Realme 6 सीरिज लाँच केली आहे. कंपनीने या सीरिजअंतर्गत Realme 6 आणि Realme 6 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केलेत. 13 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्ट आणि realme.com वर Realme 6 Pro च्या विक्रीसाठी सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, Realme 6 चा पहिला सेल 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Realme 6 फीचर्स –
हा स्मार्टफोन Comet White आणि Comet Blue या दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंच पंच-होल डिस्प्ले असून यात MediaTek Helio G90T प्रोसेसर दिले आहे. Realme 6 च्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला AI ब्युटी मोड, पोर्ट्रेट मोड, HDR सेल्फी मोड दिले आहेत. Realme 6 मध्ये 4,300 mAh ची बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर असून एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.

Realme 6 Pro के स्पेसिफिकेशंस –
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर असलेल्या Realme 6 Pro स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच ड्युअल पंच-होल डिस्प्ले असून ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. स्नॅपड्रॅगन 720G हा दमदार प्रोसेसर असलेला Realme 6 Pro हा जगातील पहिलाच फोन असल्याचं सांगितलं जातंय. यातील मुख्य कॅमेरा 16MP आणि दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. हा फोन लाइटनिंग ब्लू, लाइटनिंग ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध असेल. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड असलेल्या या फोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा, 12 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. या फोनमध्ये सुपर लाइनर स्पीकर असून हा फोन ISRO च्या NAVIC सॅटेलाइट सिस्टिमला सपोर्ट करतो. Realme 6 Pro मध्ये 4,300 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर देण्यात आलं आहे. हा फोन तासाभरात पूर्ण चार्ज होतो असा कंपनीचा दावा आहे.

Realme 6 आणि Realme 6 Pro ची किंमत आणि ऑफर्स –
Realme 6 ची बेसिक किंमत 12 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, Realme 6 Pro ची बेसिक किंमत 16 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. कंपनीने रिअलमी 6 सीरिजचे हे दोन्ही स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये आणले आहेत. Realme 6 Pro च्या 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये, 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17 हजार 999 रुपये, तर 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. Flipkart वर या स्मार्टफोनच्या पहिल्या सेलमध्ये Axis बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 1,000 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. Realme 6 च्या 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये, 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये आणि 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Realme 6 pro realme 6 launched in india price at rs 12999 know features and all other details sas
First published on: 05-03-2020 at 14:45 IST