आप्तजनांसाठी तुम्ही पार्टीचे आयोजन करीत असाल तर ‘पपई रायता विथ आईस्क्रीम’ हा रायत्याचा ऑप्शन खूप छान ठरू शकतो. यातील आईस्क्रीम या अनोख्या घटकामुळे हा रायता अधिक मलईदार होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पपई रायता विथ आईस्क्रीम
(६ जणांसाठी)

साहित्य

  • १ कप पपईचा कीस
  • २ कप दही
  • ६ चमचे व्हॅनिला आईस्क्रीम
  • २ चमचे कापलेली पुदीन्याची पाने, २ चमचे बारीक कापलेली कोथिंबीर
  • अर्धा चमचा काळे मीठ, पाव चमचा अथवा चवीनुसार मिरपूड
  • सजविण्यासाठी पपईचे छोटे छोटे बॉल्स आणि पुदिना

कृती

एका बाऊलमध्ये दह्यात मीठ, काळे मीठ, मिरपूड घालून चांगले फेटून घ्या. आता आईस्क्रीम घालून मलईदार होईपर्यंत चांगले फेटा. नंतर कोथिंबीर आणि पुदिना घालून ढवळून घ्या. पपईचा कीस चमच्याच्या सह्याने चांगला कुस्करून घ्या. आधी तयार केलेल्या दह्यात पपईचा किस घालून चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. सर्व्हिंग बाऊलमध्ये ओतून पपईच्या छोट्या छोट्या बॉल्सने आणि पुदिन्याने सजवून सर्व्ह करा.
(सौजन्य – निता मेहता)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recipes how to make creamy papaya raita with ice cream
First published on: 20-04-2015 at 06:54 IST