शाओमी कंपनीने आपला भारतातील सर्वात स्वस्त फोन म्हणून ओळख असलेल्या Redmi Go या फोनच्या किंमतीत अजून कपात केली आहे. शाओमी रेडमी गो हा फोन(1GB रॅम आणि 8GB स्टोरेज) आता केवळ 4,299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर,  1GB रॅम  आणि 16GB व्हेरिअंटची किंमत 4,499 रुपये झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माइक्रोएसडीकार्डसह दोन्ही व्हेरिअंटची मेमरी १२८जीबीपर्यंत वाढवता येते. याशिवाय Redmi Goचा HD डिस्प्ले 5 इंच (12.7 सेंटीमीटर) चा आहे. याचे रिझोल्युशन 720×128 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये नाइट लाइट फीचरही देण्यात आले आहे. ड्युअल सिमसह मायक्रोएसडी कार्डसाठी स्लॉट देखील आहे. यामध्ये 3,000 mAh ची बॅटरी असून या बॅटरीचा स्टँडबाय टाइम 10 दिवसांचा आहे. साडेबारा तास फोनवर बोलू शकतो म्हणजेच कॉलिंग करू शकतो ऐवढी क्षमता या बॅटरीची आहे. या स्मार्टफोनमध्ये रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे. तर, सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये MapsGo, GmailGo, YouTubeGo सारखे अॅप इनबिल्ट आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, ब्ल्यू-टुथ v4.1, FM रेडिओ, मायक्रो-युएसबी पोर्ट, GPS आणि 3.5mm ऑडिओ सॉकेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 20 हून अधिक प्रादेशिक भाषा आणि हिंदी गुगल असिस्टंटचा सपोर्ट देखील आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi go price cut in india now starts at rs 4299 sas
First published on: 28-01-2020 at 09:10 IST