Xiaomi चा लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro)आज (दि. 17) पहिल्यांदाच सेलमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. पहिल्याच सेलमध्ये या फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या ९० सेकंदांमध्येच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. तसेच यामध्ये 48MP प्रायमरी सेंसर आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. “रेडमी नोट 9 प्रो च्या पहिल्या सेलला इतका शानदार प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद… अ‍ॅमेझॉनवरील सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या ९० सेकंदांमध्येच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला…”अशा आशयाचं ट्विट जैन यांनी केलं. यासोबतच Redmi Note 9 Pro साठी 24 मार्च रोजी पुढील सेल आयोजित केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन व्हेरिअंटमध्ये भारतीय बाजारात आलेला Redmi Note 9 Pro ऑरोरा ब्लू, ग्लेशिअर व्हाइट, आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6.67-इंच फुल-एचडी+ IPS डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यात लेटेस्ट MIUI व्हर्जन देण्यात आलंय. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आहे. याशिवाय क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी अल्ट्रा-वाइड सेंसर, मॅक्रो लेंससोबत 5 मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,020mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये आहे.

किंमत : रेडमी नोट 9 प्रो (4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंट)ची किंमत 12 हजार 999 रुपये आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi note 9 pro first sale phone go out of stock in 90 seconds know price and specifications sas
First published on: 17-03-2020 at 16:45 IST