‘शाओमी’चा रेडमी नोट 9 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन पुन्हा एकदा भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Redmi Note 9 Pro Max च्या विक्रीसाठी 17 जून रोजी दुपारी 12 वाजेपासून अ‍ॅमेझॉन आणि mi.com या संकेतस्थळांवर ‘फ्लॅश सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. भारतात रेडमी नोट 9 प्रो मॅक्स हा फोन मार्चमध्ये लाँच करण्यात आला असून 16,499 रुपये इतकी या फोनची बेसिक किंमत आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 64 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय फोनमध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन उपलब्ध असून सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही ऑफरही असण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स :-
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असून फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे आहेत. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स आहेत.

किंमत :-
जीएसटी दरांमध्ये वाढ झाल्याने रेडमी नोट 9 प्रो मॅक्सच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये झाली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi note 9 pro max next sale on june 17 at 12 noon via amazon mi com get price in india offers specifications sas
First published on: 15-06-2020 at 10:04 IST