जिओने काही दिवसांपूर्वी बाजारात येत सर्वांनाच धक्का दिला होता. जिओच्या धमाकेदार ऑफर्समुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. काही दिवसांपूर्वी जिओने आपला फोन बाजारात दाखल करत टेलिकॉम क्षेत्रात आणखी एक धक्का दिला होता. त्यानंतर ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर्स देत त्यांना आकर्षिक करण्याचे ठरविले आहे. नुकतेच नवीन वर्षाचे निमित्त साधत आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने आणखी दोन आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत. ‘हॅपी न्यू ईयर ऑफर २०१८’ च्या अंतर्गत दोन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. यात पहिला प्लॅन १९९ रूपयांचा तर दुसरा २९९ रुपयांचा आहे. मात्र हे दोन्ही प्लॅन प्राईम जिओच्या प्राईम मेंबर्ससाठीच असून महिन्याभरासाठी असतील असे जिओने सांगितले आहे. हे प्लॅन घेतलेल्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप वापरण्याची सुविधा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोफत इंटरनेटमुळे जिओने कमी काळात मोबाईल बाजारात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. हे स्थान टिकविण्यासाठी आता कंपनीने स्वस्तात मस्त असे प्लॅन लाँच केले आहेत. १९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि SMS ची सुविधा देण्यात आली आहे. याबरोबरच दररोज १.२ जीबी 4G डेटा मिळेल. लिमीट संपल्यानंतरही ग्राहकांना डेटा मिळत राहील. मात्र त्याचा स्पीड 4G नसून कमी असेल. याशिवाय ज्यांना जास्त इंटरनेटची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी कंपनीने २९८ रुपयांचा आणखी एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये २८ दिवसांसाठी रोज २ जीबी 4G डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉल आणि SMS ची सुविधा मिळणार आहे. यामध्येही लिमिट संपल्यानंतर युजर्सना डेटा मिळेल मात्र त्याचा स्पीड कमी असेल. सध्या हा प्लॅन कंपनीच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आला नसला तरी त्याची माहिती लवकरच देण्यात येईल असे कंपनीने सांगितले आहे.

नुकतीच जिओने ३९९ रुपयांच्या रिचार्जवर २५९९ रुपयांची कॅशबॅक ऑफरही जाहीर केली. यानंतर आता कंपनीने आता कंपनीने जिओ टीव्ही लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व्हिसचे वेब व्हर्जन लॉन्च केले आहे. या सुविधेचा लाभ घेत युजर्स आता वेब ब्राऊझर्सच्या माध्यमातून लाईव्ह टीव्ही शो पाहू शकतात. जिओ टीव्हीच्या वेब व्हर्जनची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर ती पूर्ण झाल्याने युजर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio launched new plans of rs 199 and 299 for prime users
First published on: 24-12-2017 at 12:31 IST