टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने ‘मोटोरोला’च्या नवीन Motorola Razr 2019 स्मार्टफोनसाठी eSIM सपोर्ट देण्याची घोषणा केलीये. भारतात जिओची ई-सिम (Jio eSIM) सेवा आधीपासून उपलब्ध आहे. पण, Moto Razr स्मार्टफोन युजर्ससाठी ही सुविधा खास ऑफर्ससह आणली आहे. यामध्ये जिओकडून आपल्या ग्राहकांना डबल डेटा आणि डबल व्हॅलिडिटीची ऑफर दिली जात आहे. जिओ ई-सिमद्वारे युजर्स मोटो रेजर स्मार्टफोनच्या माध्यमातून कॉल करु शकतात. यासोबत युजर्स जिओ डेटा आणि जिओ अॅप्सचाही वापर करु शकतात. विशेष म्हणजे या सर्व सेवा जिओच्या फिजिकल सिम कार्डशिवाय मिळतील. म्हणजे कोणतंही सिम कार्ड न इंसर्ट करता सर्व सेवांचा वापर करता येईल. याशिवाय मोटो रेझरच्या युजर्सना जिओची एक वर्षाची अनलिमिटेड सर्व्हिस कोणत्याही अतिरिक्त शूल्काशिवाय मिळेल. तसेच, जिओच्या 4,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल डेटाचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 350 जीबी + 350 जीबी हाय स्पीड डेटा कोणत्याही डेली लिमिटशिवाय मिळेल. सोबत एक वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचाही लाभ मिळेल. अशाप्रकारे युजर्सना जवळपास14 हजार 997 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Motorola Razr 2019: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स :-
सोमवारी ‘मोटोरोला’ने आपला आयकॉनिक Motorola Razr 2019 हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला. Moto Razr हा जगातील पहिला कॅमशेल स्टाइलचा फोल्डेबल डिस्प्ले स्मार्टफोन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनबाबत चर्चा रंगली होती. 6.2 इंच फ्लेक्सिबल ओलेड एचडी+ (876×2142 पिक्सल) डिस्प्ले असून डिस्प्ले पॅनलला पूर्ण फोल्ड करता येते. फोनमध्ये एक सेकंडरी 2.7 इंच ओलेड क्विक व्ह्यू स्क्रीन आहे. या स्क्रीनचा वापर सेल्फी घेण्यासाठी , नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि म्यूझिक कंट्रोल व गुगल असिस्टंटसाठी करता येतो. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम आहे. याशिवाय, नाइट व्हिजन मोडसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून अंधारातही ब्राइट फोटो घेता येईल असा कंपनीचा दावा आहे. कॅमेऱ्यामध्ये ऑटो सीन डिटेक्शन, पोर्ट्रेट लायटिंग आहे. फोन फोल्ड केल्यानंतर हा कॅमेरा सेल्फीसाठीही वापरता येतो. तसेच, हँडसेटच्या मुख्य डिस्प्ले नॉचच्या वर एक 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 205 ग्रॅम वजन असलेल्या या फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मेमरी असून हा फोन अँड्रॉइड 9 पायवर कार्यरत असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी यांसारखे फीचर्स आहेत. तर, 2510mAh क्षमतेची 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरीही आहे. ही बॅटरी एक दिवसाचा बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे.

आणखी वाचा- किंमत 10 हजारांपेक्षाही कमी, सर्वात स्वस्त ‘पॉप अप सेल्फी’ कॅमेऱ्याच्या स्मार्टफोनचा सेल

किंमत :-
भारतात नव्या Motorola Razr 2019 ची किंमत 1 लाख 24 हदार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनच्या प्री-बुकिंगला सोमवारपासून सुरूवात झाली असून 2 एप्रिलपासून विक्री सुरू होईल. फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून फोनसाठी प्री-बुकिंग सुरू आहे. अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत 1,500 डॉलर (जवळपास 1 लाख 11 हजार रुपये) आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio providing esim service on the new moto razr motorola razr 2019 with exciting offers kno details sas
First published on: 19-03-2020 at 12:59 IST