भारतीय टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या रिलायंस जिओने आता आपली पहिली ‘आर्टिफिशिअल इंटेलीजंस’ (एआय) आधारित व्हिडीओ कॉल असिस्टंस ‘बॉट’ ही सेवा सादर केली आहे. जगातील या प्रकारची ही पहिलीच सेवा असल्याचा दावा रिलायंस जिओने केला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या इंडिया मोबाइल कॉंग्रेस 2019 मध्ये जिओने ही सेवा सादर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही 4जी स्मार्टफोनद्वारे या ‘बॉट’चा वापर करता येईल, तसंच याचा वापर करण्यासाठी अन्य कोणतंही अ‍ॅप इंस्टॉल करण्याची आवश्यकता नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. जिओच्या या सेवेद्वारे युजरला कस्टमर केअरमध्ये फोन केल्यास बराच वेळ प्रतीक्षा पहावी लागणार नाही. म्हणजेच कस्टमर सपोर्टमध्ये कॉल होल्डवर ठेवण्यापासून सूटका होणार आहे, तसंच थेट व्हिडिओ कॉलद्वारे कस्टमर सपोर्टमध्ये संपर्क करता येणार आहे. यामुळे कस्टमर सपोर्ट व कस्टमर कम्युनिकेशन मध्ये मोठी क्रांती होईल असा दावा जिओने केला आहे. या सेवेसाठी जिओने अमेरिकेच्या रेडिसिस कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या सेवेचं प्रात्यक्षिक दाखवताना जिओकडून एचडीएफसी बँकेच्या ग्राहक प्रतिनिधिंशी संपर्कही साधण्यात आला.

आणखी वाचा- 6 पैसे प्रति मिनिटवर Jio चा टोला, म्हणे आम्ही नाही ‘एअरटेल-व्होडाफोन’ मागतायेत अतिरिक्त पैसे…

जिओची ही व्हिडिओ बॉट सेवा आर्टिफिशियल इंटेलिजंस तंत्रज्ञानावर कार्यरत राहिल. अगदी मानवाप्रमाणे उत्तरे या बॉटद्वारे दिले जातात. अचूक उत्तरे देण्यासाठी ऑटो लर्निंग फिचरचा वापर यात करण्यात आला आहे. मात्र ही सेवा अधिकृतपणे केव्हा लाँच होईल याबाबत अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio unveils ai powered video call assistant sas
First published on: 15-10-2019 at 12:30 IST