सॅमसंगने गेल्या महिन्यात लाँच केलेला स्मार्टफोन Galaxy A21s स्वस्त झाला आहे. कंपनीने फोनच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात केली आहे. तर, या फोनच्या 4GB + 64GB मॉडेलच्या किंमताीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप, सॅमसंग Exynos 850 प्रोसेसर, 5,000 एमएएच बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारा हा फोन कंपनीने  गेल्या महिन्यातच भारतात लाँच केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पेसिफिकेशन्स :-
Galaxy A21s या फोनमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. फोनच्या मागील बाजूला 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा म्हणजेच चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. सॅमसंग गॅलेक्सी A21s मध्ये infinity-O डिस्प्ले असून याद्वारे युजर्सना दर्जेदार व्हिजुअल्सचा अनुभव मिळतो. तसेच या फोनमध्ये दमदार बॅटरीही देण्यात आली आहे. ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा infinity-O डिस्प्ले असून 5,000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. ही बॅटरी 21 तासांचा व्हिडिओ प्ले-बॅक सपोर्ट देते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय या फोनमध्ये Exynos 850 चिपसेट असून AI पॉवर्ड गेम बूस्टर 2.0 दिले आहे. यामुळे गेम खेळताना फ्रेम रेट आणि स्टेबिलिटी सुधारण्यास मदत होते, तसेच बॅटरीचाही कमी वापर केला जातो. फोनमध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज असून 512GB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.

मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप :-
अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन कार्यरत असून फेस रिकग्निशन आणि फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर्सही फोनमध्ये आहेत. मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 2-2 मेगापिक्सलचे अन्य दोन कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे.

किंमत :-
किंमतीत कपात झाल्याने Galaxy A21s (6GB रॅम आणि 64GB स्टोरेज) ची किंमत आता  17 हजार 499 रुपये झाली आहे. तर, या फोनच्या  4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत कपात झालेली नाही. त्यामुळे हा फोन अजूनही 16,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

अजून वाचा (‘सॅमसंग’चा स्वस्त Galaxy स्मार्टफोन भारतात झाला लाँच, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार दमदार फीचर्स)

 

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy a21s receives price cut for 6gb ram variant in india sas
First published on: 21-07-2020 at 10:02 IST