भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील आघाडीवर असणारी सॅमसंग कंपनी लवकरच आपला आणखी एक फोन घेऊन येत आहे. आपल्या प्रसिद्ध अशा A सीरीजची पुढील आवृत्ती घेऊन सॅमसंग येत आहे. लवकरच Samsung Galaxy A70 स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. या फोनचे वैशिट्य म्हणजे या फोनची बॅटरी कमी कालावधीत चार्ज होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Samsung Galaxy A70 या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच फिचरसह ६.७ इंचाचा एचडी डिस्प्ले असणार आहे. या फोनला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचा सेल्फी कॅमेरा तब्बल ३२ मेगापिक्सेलचा आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता ४,५०० mAh देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड पाई ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. कंपनी १० एप्रिल रोजी गॅलेक्सी A इवेंट आयोजीत करणार आहे.

Samsung Galaxy A70 या स्मार्टफोनची किंमत १० एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आलेल्या इवेंटमध्ये सांगण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू, कोरल आणि व्हाइट या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनला 3D ग्लास्टिक डिझाईन देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच वॉल्यूम आणि पॉवर बटण स्मार्टफोनच्या डाव्याबाजूस देण्यात आले आहे.

काय आहेत फोनचे फिचर्स:

-वॉटरड्रॉप नॉच

-६.७ इंच डिस्प्ले

-३२ मेगापिक्सेल + ८ मेगापिक्सेल + ५ मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा

-३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा

-४,५०० mAh बॅटरी

-अॅन्ड्रॉइड पाई व्हर्जन

-इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर

-ऑक्टा-कोर प्रोसेसर

-६ जीबी आणि ८ जीबी रॅम

-१२८ जीबी स्टोरेज

-सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy a70 smartphone launch
First published on: 26-03-2019 at 15:58 IST