सॅमसंग कंपनी चार रिअर कॅमेरा असलेला Galaxy A9 आज लाँच करण्याच्या तयारीत आहे. मलेशियामध्ये गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन कंपनीने सादर केला होता. मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप ही या स्मार्टफोनची खासियत असणार आहे. चार रिअर कॅमेरे असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल असं सांगितलं जात आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये एका कार्यक्रमात हा फोन लाँच केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपेक्षित किंमत आणि स्पेसिफिकेशन –
Galaxy A9 अॅन्ड्रॉइड 8.0 ओरियोवर कार्यरत असेल. यामध्ये 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) इन्फिनिटी डिस्प्ले असेल. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी आणि 8 जीबी रॅमचा पर्याय असेल. एफ/1.7 अपर्चर असलेला 24 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. तर, 10 मेगापिक्सलचा दूसरा टेलीफोटो कॅमेरा आहे. यासोबत देण्यात आलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा 120 डिग्री लेंस आणि एफ/2.4 अपर्चरसोबत असेल. अखेरचा म्हणजे चौथा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा (अपर्चर एफ/2.2) डेप्थ कॅमेरा असेल. याशिवाय सेल्फीप्रेमींसाठी Samsung Galaxy A9 (2018) मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फेस अनलॉक, बिक्सबी असिस्टंट आणि सॅमसंग पे हे फिचर असतील. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्ल्यूटुथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि आरजीबी लाइट सेंसर हे फिचर देखील असतील. याशिवाय फास्ट चार्जिगला सपोर्ट करेल अशी 3800 एमएएच पावरची बॅटरी यामध्ये असणार आहे. या स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 35 हजार 999 रुपये असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy a9 launch today
First published on: 20-11-2018 at 12:44 IST