Samsung कंपनीने गेल्या आठवड्यातच आपला Galaxy M40 हा नवा स्मार्टफोन अधिकृतपणे भारतात लाँच केला होता. आज(दि.18) या स्मार्टफोनसाठी भारतात पहिल्याच सेलचं आयोजन करण्यात आलं आहे.  दुपारी 12 वाजेपासून Amazon आणि Samsung च्या अधिकृत संकेतस्थळावर सेल सुरू होत आहे. या फोनच्या खरेदीवर व्होडाफोनच्या ग्राहकांना 255 रुपयांच्या रिचार्जवर 3 हजार 750 रुपये कॅशबॅक, तर जिओच्या ग्राहकांना 198 आणि 299 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर अतिरिक्त इंटरनेटचा फायदा मिळेल. याशिवाय व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना 18 महिन्यांसाठी अतिरिक्त 0.5 जीबी डाटा मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्मार्टफोनमध्ये फुल-एचडी+ इनफिनिटी ओ डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा 32 MP, दुसरा कॅमेरा 5MP आणि अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस असलेला 8MP चा तिसरा कॅमेरा आहे. कॅमेऱ्यामध्ये 4K रेकॉर्डिंग, स्लो-मोशन आणि हायपरलॅप्सचा सपोर्ट देखील आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Galaxy M40 ची इंटर्नल मेमरी 128GB असून मेमरी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi, ब्ल्यु-टूथ, GPS/ A-GPS आणि USB टाइप-C सपोर्ट आहे. ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर आहे.  फिंगरप्रिंट स्कॅनर फोनच्या मागील बाजूला देण्यात आलं आहे. यामध्ये 3,500mAh ची बॅटरी आहे, फास्ट चार्जिंगसाठी यामध्ये 15W फास्ट-चार्जिंगचा सपोर्ट आहे. Galaxy M40 ची भारतीय बाजारात Realme आणि Xiaomi यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा असणार आहे.

19 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात आली आहे. यात ‘स्क्रीन साउंड’ तंत्रज्ञान  आहे. स्क्रीन साउंड तंत्रज्ञान असणारा हा या मालिकेतील पहिलाच स्मार्टफोन आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy m40 first sale india sas
First published on: 18-06-2019 at 10:40 IST