आज सायंकाळी अमेरिकेमध्ये सॅमसंग गॅलक्सी एस आठचे लाँचिंग होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सॅमसंगची बाजारावरील पकड ढिली झाली होती. नव्या फोनमुळे बाजारात आपण आपले स्थान निर्माण करू शकू असा विश्वास कंपनीला वाटत आहे.  मागील वर्षी गॅलक्सी नोट ७ च्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे सर्व स्मार्टफोन परत मागवण्यात आले होते. परंतु हा नवा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरून गुणवत्तेची परीक्षा पास होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अॅपलच्या आयफोन ७ला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने गॅलक्सी नोट ७ घाईघाईने बाजारात आणला. त्यांच्या बॅटरीमध्ये तांत्रिक त्रुटी राहून गेली. त्यामुळे नोट ७ चा स्फोट होऊ लागला होता. यामुळेच कंपनीला अब्जावधीचे नुकसान झाले होते. तसेच सॅमसंगची प्रतिष्ठा देखील पणाला लागली होती. कंपनीने हे नुकसान भरुन काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पंरतु, त्याच काळात सॅमसंगचे उपाध्यक्ष ली जे यॉंग हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले.

अमेरिकेच्या द वर्ज वेबसाइटने ही सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात मोठी कसोटी असल्याचे म्हटले आहे. विश्वासार्हता आणि अद्ययावत तंत्रज्ञान या दोन्ही स्तरावर सॅमसंगने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक आहे असे द वर्जने म्हटले आहे. सॅमसंगला या नव्या सिरीजकडून खूप अपेक्षा आहेत. सॅमसंग गॅलक्सी ८ चे पदार्पण म्हणजे एका नव्या युगाचा आरंभ आहे असे कंपनीने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे.  या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. जीएसएम अरेनाने दिलेल्या वृत्तानुसार गॅलक्सी एस आठला फ्रंट होम बटन नाही, ड्युएल कॅमेरा सेटअप देखील नसल्याचे म्हटले आहे. या फोनच्या लीक झालेल्या इमेजनुसार हा फोन अतिशय स्लिम आहे. मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या एस ७ या सॅमसंगच्या सिरिजशी या फोनच्या कडा मिळत्या-जुळत्या आहेत.

Puneri Patya Video
Puneri Patya : “… अन्यथा मत मिळणार नाही” पुणेरी पाट्यांचा विषय जगात भारी, पाहा व्हायरल VIDEO
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
How to remove Bad Smell From Dustbin with the help of five rupees
फक्त पाच रुपयांचा बेकिंग सोडा गायब करेन कचरापेटीतील दुर्गंधी, पाहा VIDEO

टचस्क्रीन आल्यानंतर फोनला केवळ फ्रंट होम बटन आणि बॅकचे बटन असेल. या फोनला फ्रंट होम बटन नाही. हा फोनला ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर आहेत. दुसरे वैशिष्ट्य असे की या फोनला ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप नाही. याच फोनच्या प्लस या व्हॅरियन्टसाठी हे फीचर उपलब्ध असेल अशी शक्यता आहे. या फोनमध्ये ३.५ मीमीचा हेडफोन जॅक उपलब्ध आहे. यासोबतच युएसबी टाइप सी हे पोर्टही उपलब्ध असणार आहे. सॅमसंग गॅलक्सी एस ८ ला तळाशी आणि वर या दोन्ही ठिकाणी स्पीकर ग्रिल्स आहेत. या फोनला स्टिरिओ स्पीकर्स असतील असा अंदाज आहे.