सॅमसंगचा बहुचर्चित गॅलेक्सी नोट ८ हा फोन न्यूयॉर्कमध्ये एका शानदार सोहळ्यात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन असून मोठी स्क्रीन, ड्युएल रेअर कॅमेरा आणि सॅमसंगची ‘व्हॉइस सिस्टीम’ ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. हा फोन ऑक्टोबरमध्ये लाँच होणे अपेक्षित होते. मात्र ‘आयफोन ८’ च्या आधी फोन लाँच करण्याचा हेतूने सॅमसंगने हा फोन लवकर बाजारात आणल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसा दिसतो फोन
हा फोन दिसायला थोड्याफार फरकाने गॅलेक्सी एस ८ फोनसारखाच आहे. फोनची बॉडी ग्लास आणि मेटलची आहे. फोनला एज स्क्रीन आहे. म्हणजेच फोनच्या कडांवरही टचस्क्रीन देण्यात आलेली आहे. फोनच्या मागच्या बाजूस म्हणजेच बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेला आहे.

डिस्प्ले
या फोनला ६.३ इंचाचा इन्फिनिटी डिस्प्ले आहे. फोनची स्क्रीन सुपर अमोल्ड स्क्रीन आहे. तर गोरिला ग्लास असणाऱ्या या स्क्रीनचे रेझोल्यूशन १४४० X २९६० पिक्सल्स इतके आहे. हा फोन मीड नाईट ब्लॅक, ऑर्किड ग्रे, डीप सी ब्लू आणि मॅपल गोल्ड रंगामध्ये उपलब्ध आहे.

प्रोसेसर
गॅलक्सी नोट ८ मध्ये ऑक्टाकोअर स्पॅनपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये सॅमसंगचे स्वत:चे एक्सोनस ८८९५ चिपसेट देण्यात आला असून फोनमधील रॅम 6 जीबी एवढी आहे. एक्सपांडेबल मेमरीनुसार हा फोन ६४ जीबी, १२८ जीबी, २५६ जीबी या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे.

बॅटरी आणि कॅमेरा
या फोनची बॅटरी ३३०० एमएएच इतकी असून दोन्ही रेअर कॅमेरा १२ मेगापिक्सलचे आहेत. तर फ्रंट कॅमेरा ८ मेगा पिक्सलचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही कॅमेरांसाठी ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशनचे फिचर देण्यात आले आहे.

किंमत
अमेरिकेमध्ये हा फोन ९३० डॉलरला उपलब्ध होणार आहे. तर भारतामध्ये या फोनची अंदाजे किंमत ६५ ते ७० हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे.

स्टायलस
या फोनबरोबर ग्राहक एस-पेन हा नवा स्टायलसही विकत घेऊ शकता. हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक सेन्सीटीव्ह स्टायलस असणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsungs galaxy note 8 comes with a 6 3 inch screen
First published on: 24-08-2017 at 10:34 IST