कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आणि कोणत्याही पूजेमध्ये सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. भाद्रपद हा विशेषतः गणेशाच्या पूजेसाठी समर्पित महिना आहे. पंचांगानुसार, या महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा उपवास बुधवार,२५  ऑगस्ट रोजी पडत आहे. गजाननाचा आवडता बुधवार असल्याने चतुर्थी तिथी आणखी फलदायी आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुम्हाला शुभ लाभ मिळतात. संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करण्याची पद्धत, मुहूर्त, तिथी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संकष्टी चतुर्थीची तारीख आणि वेळ

हिंदी पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत २५  ऑगस्ट, बुधवारी पाळले जाईल. तथापि, चतुर्थी तिथी २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४.१८ वाजता सुरू होईल. पण दिवसा गणपतीची पूजा केली जाते, त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा उपवास फक्त २५ ऑगस्टलाच ठेवला जाईल. हा दिवस बुधवार असल्याने गणेश उपासना अधिक फलदायी आहे कारण बुधवार गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुध ग्रह देखील मजबूत होऊ शकतो.

गणेश पूजेची पद्धत

संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम लाल रंगाच्या आसनावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. यानंतर, गणपतीला सिंदूर टिळक लावा आणि धूप, दिवा, सुगंध, फळे आणि फुले अर्पण करा. गणपतीला दुर्वा नक्कीच अर्पण करावी. गणपतीला त्यांचे आवडते मोदक किंवा लाडू अर्पण करावेत. यानंतर, गणपतीचे मंत्र आणि स्त्रोतांनी गणपतीची स्तुती करा. गणपतीच्या आरतीने पूजेचा शेवट झाला पाहिजे.

संकष्टी चतुर्थीला या मंत्रांचा जप करा

भगवान गणेश विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता आहेत, त्यांची पूजा केल्याने भक्ताच्या जीवनातून सर्व त्रास आणि त्कष्ट दूर होतात. म्हणूनच गणपतीच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या संकष्टी चतुर्थीला या काही मंत्रांचा जप करून गणपतीची पूजा करा.

१. ‘ॐ गं गणपतये नम’ – जीवनात आनंद आणण्यासाठी मंत्र

२. ‘ॐ वक्रतुंडाय हुं’ – संकटहारी मंत्र

३. ‘ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा’ – रोजगार मिळवण्यासाठी मंत्र

४. ‘ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा’ – जीवनातील कलह आणि अशांतता दूर करण्याचा मंत्र

५. ‘ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा’ – सौभाग्य प्राप्ती करण्यासाठी मंत्र

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankashti chaturthi 2021 when is heramba sankashti chaturthi 2021 know date significance shubh muhurat and puja vidhi ttg
First published on: 25-08-2021 at 12:56 IST