तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.
तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे. अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे. त्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बिअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे. आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे. उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या. रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे. पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे. वाढत्या अभ्यासाचे क्षेत्र.  या वा इतर कारणांनी निद्रानाश होऊ शकतो.  झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्यांनी आपण ग्रस्त होतो. यासाठी पुढील साधारण उपाय करावेत….
नियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.
योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते..
रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.
चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.
नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-या ची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple solutions for good sleep
First published on: 11-11-2013 at 02:08 IST