स्काईप हे व्हिडियो कॉलिंगसाठी वापरले जाणारे सर्वात जुने अॅप्लिकेशन म्हणून ओळखले जाते. परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांसाठी किंवा अगदी ऑफीसच्या मिटींग्जसाठीही या अॅपचा वापर केला जातो. या अॅप्लिकेशनवर ग्राहकांना आता एक नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. कंपनीने नुकतीच याबाबतची घोषणा केली असून नेमक्या कोणत्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल हे सांगितले आहे. स्काईपवर आता कॉल रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेऊन तुम्हाला आपल्या कॉलमधील विशेष क्षण साठवून ठेवता येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या या कंपनीने आपल्या अपडेटेड व्हर्जनसाठी ही सुविधा दिली आहे. हे नवीन व्हर्जन डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्हीसाठी उपलब्ध असेल असे सांगण्यात आले आहे. सध्या विंडोज १० ऑपरेटींग सिस्टीमवर ही सुविधा उपलब्ध नसेल. मात्र काही आठवड्यातच ती उपलब्ध होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. स्काईपने व्हिडियो कॉलिंगची सुविधा १० वर्षापूर्वी सुरु केली असून कालांतराने त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. हे रेकॉर्डिंग करणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी काय करावे लागेल पाहूयात…

– तुमच्या स्काईप अकाऊंटवर खालच्या बाजूला ‘+’ चिन्ह असेल, त्यावर क्लिक करा.

– त्याठिकाणी रेकॉर्डिंगचा पर्याय देण्यात आला आहे. स्टार्ट रेकॉर्डिंग यावर क्लिक करा.

– समोरचा व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर ते तुम्हाला कळणार आहे. आपली यंत्रणा पारदर्शी ठेवण्यासाठी असे केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

– हा रेकॉर्ड केलेला व्हिडियो ३० दिवसांमध्ये डाऊनलोड करुन शेअर करता येणार आहे.

– हा रेकॉर्डेड कॉल डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी चॅटच्या पर्यायावर जाऊन मोअर ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर Save to Download किंवा एखाद्या विशिष्ट फोल्डरमध्ये सेव्ह करायचे असल्यास Save as वर क्लिक करा. याचप्रमाणे मोबाईलवरही रेकॉर्ड करता येणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skype finally started call recording service
First published on: 05-09-2018 at 14:29 IST